Join us  

पंकज उधास यांचे नवीन भक्तीगीत ‘जय गणेश’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 6:49 PM

प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे पहिलेच गणपतीवरील नवीन गाणे सिद्धिविनायक गणपती मंदिरावर आधारित आहे. ‘जय गणेश’ नावाचे हे भक्तीगीत सीडीचे नुकतेच अनावरण करण्यात आले.

ठळक मुद्देपंकज उधास यांचे पहिलेच गणपतीवरील गाणे ‘जय गणेश’

 प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे पहिलेच गणपतीवरील नवीन गाणे सिद्धिविनायक गणपती मंदिरावर आधारित आहे. ‘जय गणेश’ नावाचे हे भक्तीगीत सीडी स्वरुपात उपलब्ध होणार आहे. नुकतेच या भक्तिगीताचे प्रकाशन प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात देवाच्या चरणी सीडी अर्पण करून करण्यात आले. 

“गणपती बाप्पाच्या आगमनाला आता काही दिवसच बाकी असताना मुंबई, महाराष्ट्रबरोबरच संपूर्ण देश आणि जगातच चैतन्याची एक लहर पसरली आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये हे चैतन्य शिगेला पोहचणार आहे. मी गेली कित्येक वर्षे सिद्धीविनायकाची भक्ती करतो आहे. मला सिद्धीविनायकाच्या चरणी एक गाणे अर्पण करायचे होते आणि गेली कित्येक वर्षे ते मनात घोळत होते. आता या गाण्याच्या रूपाने ते स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. विशाल धुमाळ यांनी अत्यंत सुंदररित्या संगीतरचना केली असून गाण्याचे अर्थपूर्ण व भक्तिपूर्ण बोल आलोक श्रीवास्तव यांनी लिहिले आहेत. मला पूर्ण खात्री आहे की, बाप्पाच्या सर्व भक्तांना माझी ही छोटेखाणी भेट नक्कीच पसंत पडेल,” असे उद्गार पंकज उधास यांनी काढले.ते पुढे म्हणाले की, “गेल्याच आठवड्यात कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने आम्ही जुहू येथील इस्कॉन मंदिरात ‘कृष्ण चांट्स’ या अल्बमचे विमोचन केले. माझे भाग्य असे की आता सिद्धिविनायकाच्या चरणी माझी भक्तीरुपी सेवा अर्पण करण्याची संधी मला या सीडीच्या माध्यमातून मिळत आहे.” या गीतासाठी विशाल धुमाळ यांनी संगीत दिग्दर्शन केले असून संगीत रचना अवि लोहार यांची आहे. लोकेश लोहार यांनी संकलन केले असून आलोक श्रीवास्तव यांनी गीते लिहिली आहेत. व्हिडीओचे दिग्दर्शन राजेश सेठी यांनी केले असून अमोल कुलकर्णी सह-दिग्दर्शक आहेत. संजय कुमार आणि राजेश सिंग यांनी व्हिडीओसाठी कॅमेरामेन म्हणून काम पाहिले आहे. ओमकार धुमाळ यांनी शेहनाई वाजवली असून ओजस अधिया यांनी तबला वाजवला आहे. सत्यजित जामसंडेकर, राहुल रुपवते यांनी ऱ्हीदम सांभाळला आहे तर संतोष बोटे, सागर लेले, विवेक नाईक, राहुल चिटणीस, सोनल नाईक, निशिगंधा फाटक, सपना हेमन व वंदना कुलकर्णी यांनी कोरस दिला आहे. व्हिडीओचे चित्रीकरण आशीष चौबे यांनी ‘स्टुडीओ 17’मध्ये केले असून आफ्ताब खान यांनी ‘हेडरूम स्टुडीओ’ येथे मिक्सिंग केले आहे. त्यांना वत्सल चेवली यांनी सहाय्य केले आहे. या अल्बमची निर्मिती वेल्वेट व्हॉइसेस प्रायव्हेट लिमिटेडने केली आहे. डिजिटल भागीदार हंगामा; हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेन्मेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज रॉय; भूमिका शुक्ला व कबीर खान यांचे पंकज उधास यांनी विशेष आभार मानले आहेत.