Join us  

पद्मावतीची रिलीज डेट आणखीन लांबणीवर ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 4:12 AM

संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट पद्मावतीच्या मागचे शुक्लकाष्ट काही संपण्याचे नाव घेत नाही आहे. दिवसांदिवस पद्मावतीच्या रिलीजला होणारा विरोध ...

संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट पद्मावतीच्या मागचे शुक्लकाष्ट काही संपण्याचे नाव घेत नाही आहे. दिवसांदिवस पद्मावतीच्या रिलीजला होणारा विरोध वाढत चालला आहे. त्यामुळे निर्मात्यांना पद्मावचीची रिलीजीची तारीख पुढे ढकलावी लागत आहे. आधी हा चित्रपट 1 डिसेंबरला रिलीज होणार होता. ‘सीबीएफसी’ या आठवड्यात हा चित्रपट बघणार आहे. या चित्रपटाविषयी निर्णय तेच घेणार आहेत. शर्माने त्यावेळी याचिकेद्वारा, हा चित्रपट रीलिज होऊ देऊ नये, वादग्रस्त दृष्य काढणे तसेच भंसालीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यात राणी पद्मावतीला 'नृत्यांगना' म्हणून दाखविण्यात आली असून त्यावरुन आरोप करण्यात आले आहेत की, या चित्रपटात पद्मावतीच्या बाबतीत चुकीचे तथ्य दाखविण्यात आले आहे. याचिकाकर्ता अ‍ॅड. एम.एल. शर्मा यांनी निर्मात्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, निर्मात्यांनी हे सांगून तथ्यांशी छेडखानी केली आहे की, चित्रपटातील गाणे आणि प्रोमोला केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड (सीबीएफसी) ने हिरवा झेंडा दिला आहे. ऐवढेच नाही  संजय लीला भन्साळी यांना तसेच चित्रपटातील कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. भन्साळींना ‘पद्मावती’ बनवण्यास जवळपास दोन वर्षे लागलीत. पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट वादात सापडला. चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत, सर्वप्रथम राजपूत करणी सेनेने या चित्रपटाच्या सेटवर धिंगाणा घातला. यावेळी भन्साळींना मारहाणही करण्यात आली. यानंतर चित्रपटाचा सेट कोल्हापुरात हलवण्यात आला. पण इथेही काही अज्ञातांनी सेटवर आग लावली. आता तर हा चित्रपट रिलीज होऊच देणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे.ALSO READ :  ‘पद्मावती’ वादावर बोलली प्रियंका चोपडा; संजय लीला भन्साळींबद्दल केले हे वक्तव्य!फेब्रुवारीमध्ये हा चित्रपट रिलीज होणार असी चर्चा होती मात्र आता अशी माहिती मिळतेय की काही तांत्रिक अडचणींमुळे हा चित्रपट मार्चपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.  मात्र चित्रपटाला इतक्यात प्रमाणपत्र मिळणे काहीसे कठिण झाले आहे. कारण ‘डीएनए’ने दिलेल्या बातमीनुसार, पद्मावतीच्या आधी इतर ४० चित्रपट प्रमाणपत्र मिळण्यासाठी रांगेत आहेत.