Join us  

Padmavati Controversy : कंगना राणौतने दीपिका पादुकोणला पाठींबा देण्यास का दिला नकार? वाचा, कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 6:46 AM

बॉलिवूडमध्ये सध्या ‘पद्मावती’ वादग्रस्त विषय बनला आहे. ‘पद्मावती’वरून सुरू असलेल्या ‘राजकारणात’ या चित्रपटात राणी पद्मावतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका ...

बॉलिवूडमध्ये सध्या ‘पद्मावती’ वादग्रस्त विषय बनला आहे. ‘पद्मावती’वरून सुरू असलेल्या ‘राजकारणात’ या चित्रपटात राणी पद्मावतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तूर्तास अख्खे बॉलिवूड दीपिकाच्या सपोर्टमध्ये उतरले आहे. पण बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने मात्र दीपिकाला या प्रकरणी सपोर्ट करण्यास नकार दिला आहे. ही अभिनेत्री कोण, हे तुम्हाला ठाऊक आहेच. आम्ही काल-परवाच याबद्दल माहिती दिली होती. ही अभिनेत्री म्हणजे कंगना राणौत. होय, अभिनेत्री शबाना आझमी यांनी ‘दीपिका बचाओ’ नामक स्वाक्षरी मोहिम उघडली आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी या पिटीशनवर स्वाक्षरी केलीयं. पण कंगनाने मात्र यावर स्वाक्षरी करण्यास ठाम नकार दिला होता. अर्थात तिच्या नकारामागचे कारण कळले नव्हते. पण आता हे कारणही समोर आले आहे. होय, कंगनाने स्वत: हे कारण सांगितले आहे. तू दीपिकाला सपोर्ट करण्यास का नकार दिलास? असा प्रश्न तिला अलीकडे विचारण्यात आला आणि कंगनाने अगदी बेधडक याचे उत्तर दिले.‘मी जोधपूरमध्ये माझ्या चित्रपटाच्या शूटमध्ये बिझी होते. अचानक माझी मैत्रिण अनुष्का शर्माचा मला फोन आला. दीपिकाच्या सपोर्टमध्ये शबाना आझमीने एक पिटीशन पाठवले आहे, त्यावर साईन कर, असे तिने मला सांगितले. पण मी त्याला नकार दिला. मला याप्रकरणात शबाना आझमीच्या राजकारणाचा भाग व्हायचे नाही. शबाना आझमी आणि त्यांच्या राजकारणामुळे मी थोडी व्यथित आहे. सध्याची देशाची स्थिती मी चांगलीच जाणून आहे. मला दिखावा करायचा नाही. मी नारी सेवेच्या सर्व आंदोलनात भाग घेते. दीपिका बचाओ, आंदोलनातही मी दीपिकाच्या बाजूने आहे, असे मी अनुष्काला सांगितले. अनुष्काला माझे म्हणणे पटले. दीपिकाला माझा पाठींबा आहे आणि कुठल्याही पिटीशनशिवाय एकटी दीपिकाला पाठींबा देऊ शकते,’ असे कंगना म्हणाली.एकंदर काय तर कंगना यावेळीही चांगलीच खमकी निघाली. दीपिकाला एकटीने पाठींबा देण्यासाठी मी पुरेशी आहे, हे सांगून तिला काय म्हणायचे हे तिने अगदी मोजक्या शब्दांत स्पष्ट केले.ALSO READ : ​​अख्खे बॉलिवूड ‘पद्मावती’च्या बाजूने, पण कंगना राणौतने घेतला वेगळाच निर्णय!