Join us  

केवळ 8 हजारांच्या ड्रेसमध्ये एअरपोर्टवर दिसली कॅटरिना कैफ !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 8:20 AM

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ नेहमीच एअरपोर्टवरुन येता-जाताना मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद होतेच. यावेळी लंडनच्या एअरपोर्टवर दिसली ती एका खास लूकमध्ये. ...

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ नेहमीच एअरपोर्टवरुन येता-जाताना मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद होतेच. यावेळी लंडनच्या एअरपोर्टवर दिसली ती एका खास लूकमध्ये. कॅटरिनाने यावेळी परिधान केलेल्या ड्रेसची किंमत होती केवळ 8 हजार. लंडनच्या एअरपोर्टवरुन कॅटरिना अबु धाबीला एका इव्हेंटसाठी निघाली.  कॅटरिना कैफ आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी ती लंडन एअरपोर्टवर जारा ब्रँडच्या कलेक्शनमधल्या ड्रेसमध्ये दिसली.  कॅटरिना कैफने ग्रीन कलरमध्ये ब्लॅक आणि क्रीम मिक्स कलरचा सूटमध्ये दिसली. ज्यात ती खूप सुंदर दिसत होती. कॅटरिनाने या सूटवर केज्युअल व्हाइट सॉल असलेले ब्लॅक कलरचे शूज तिने घातले होतो यासोबत तिने काळ्या रंगाचा चष्मा लावला होता. ALSO RAED :  ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये कॅटरिना कैफ नाही आमिर खानची हिरोईन !कॅटरिना कैफने नुकतेच सलमान खानसोबत टायगर जिंदा है चे शूटिंग पूर्ण केले आहे.  हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान आणि कॅटची जोडी पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स आतुर आहेत. आबु धाबीमध्ये 45 दिवस या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. रणबीरशी झालेल्या ब्रेकअपनंतर या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कॅटरिना सलमानच्या जवळ आल्याची देखील चर्चा होती. तब्बल 5 वर्षानंतर दोघे स्क्रिनवर एकत्र दिसणार आहेत. यानंतर कॅट कबीर खानच्या चित्रपटात दिसणार आहे. १९८३ मध्ये भारताला क्रिकेटमध्ये वर्ल्डकप मिळवून देणाऱ्या टीमवर आधारित चित्रपटात ती दिसणार आहे. यात ती  कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिका साकारणार आहे. यात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. रणवीरच्या पत्नीच्या भूमिकेत कॅटरिना कैफ दिसणार आहे. त्यामुळे रणबीर आणि कॅटरिनाची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. रणवीरच्या अपोझिट कॅटरिना कैफ कपिल देव यांची पत्नी रोमी देवची भूमिका साकारणार आहे. असे म्हटले जाते की, कपिल देव यांच्या यशात त्यांची पत्नी रोमीचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यामुळे कॅटरिनाला रोमी यांची भूमिका साकारणे खूपच आव्हानात्मक असणार आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या संघाने वर्ल्डकप स्पर्धेत वेस्ट इंडिजला १८१ धावांनी पराभूत करीत वर्ल्डकप जिंकला होता.