अभिनेत्री शर्लिन चोप्रा अलीकडेच रॅपर, कॉन्टेंट क्रिएटर व निर्मातीदेखील बनली आहे. काही दिवसांपूर्वी शर्लिनने एक रॅप साँग लाँच केलं. या गाण्याचं खूप कौतूक झालं. या गाण्यानंतर तिला बऱ्याच प्रोजेक्ट्सच्या ऑफर्स येत आहेत आणि ती सध्या बिझी आहे. मात्र आता शर्लिन चोप्राच्या जीवनावर आधारीत एक शॉर्टफिल्म रसिकांच्या भेटीला येणार आहे. या शॉर्टफिल्मचं नाव आहे द लास्ट विश.
द लास्ट विश शॉर्टफिल्ममध्ये शर्लिनने एका मुलावर मनापासून प्रेम केले होते. या प्रेमात तिला धोका मिळाला. तिच्या या शॉर्टफिल्मचा टीझर प्रदर्शित केला आहे ज्यात ती स्वतः सांगते आहे की, ज्याच्यावर प्रेम केलं त्यानेच न्यूड कॅटवॉक करायला सांगितलं. आता तोच माझ्यासाठी काम करतो आहे. माझा जीवन प्रवास पहा द लास्ट विशमध्ये.
द लास्ट विशमधून शर्लिनच्या जीवनातील बऱ्याच गोष्टी पहायला मिळणार आहे आणि ही शॉर्टफिल्म डिसेंबरमध्ये ‘द शर्लिन चोप्रा अॅप’ वर लाँच केली जाईल.