Join us

पुन्हा एकदा ‘हाय रेटेड गबरू’ अन् पुन्हा एकदा वरूण-श्रद्धा! येतेय एक धमाकेदार डान्स फिल्म!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 12:07 IST

जुन्या चर्चित गाण्यांचा रिमेक ही कसरत बरीच जुनी आहे. पण अलीकडे जुनी गाजलेली गाणी उचलून ती सरळ सरळ रिक्रिऐटेड ...

जुन्या चर्चित गाण्यांचा रिमेक ही कसरत बरीच जुनी आहे. पण अलीकडे जुनी गाजलेली गाणी उचलून ती सरळ सरळ रिक्रिऐटेड सॉन्गच्या नावावर प्रेक्षकांच्या गळी उतरवण्याचा एकच नवाच प्रकार वाढला आहे. आता आणखी एक असेच रिक्रिएटेड गाणे आपल्याला ऐकायला मिळणार आहे. होय, ‘गुरू रंधावा’मधील ‘हाय रेटेड गबरू’ या लोकप्रीय गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन ‘नवाबजादे’ या चित्रपटात बघायला मिळणार आहे. मजेदार गोष्ट म्हणजे या गाण्यावर वरूण धवन आणि श्रद्धा कपूर पुन्हा एकदा एकत्र थिरकताना दिसणार आहेत. वरूण व धवन या चित्रपटात केवळ या गाण्यापुरते दिसणार आहेत. बाकी या चित्रपटाची स्टारकास्ट एकदम वेगळी आहे. वरूण व श्रद्धा यापूर्वी रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी2’मध्ये एकत्र दिसले होते. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. आता पुन्हा ‘गुरू रंधावा’च्या ‘हाय रेटेड गबरू’वर ही जोडी धम्माल डान्स करताना दिसेल. ‘गुरू रंधावा’ची ‘सूट सूट’ आणि ‘बन जा रानी’ सारख्या सुपरहिट गाण्यांना आधीच रिक्रिऐट करण्यात आले आहे. आता ‘हाय रेटेड गबरू’ही रिक्रिऐट केले जात आहे.‘नवाबजादे’मधून लोकप्रीय कोरिओग्राफर जयेश प्रधान आपला बॉलिवूड डेब्यू करतोय. या चित्रपटात राघव जुयाल, पुनीत पाठक आणि धर्मेश मुख्य भूमिकेत आहेत. या सर्वांनी याआधी वरूण व श्रद्धासोबत ‘एबीसीडी2’मध्ये काम केले आहे.‘नवाबजादे’ एक डान्स बेस्ड चित्रपट आहे. हा चित्रपट आॅगस्टमध्ये रिलीज होतो आहे. रेमो डिसुजा निर्मित या चित्रपटाची कथाही रेमोचीच आहे.