Join us  

OMG!! ​भर रस्त्यात ड्रायव्हरशी भिडला सुशांत सिंह राजपूत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 7:25 AM

अभिनेता सुशांत सिंह राजपूत बॉलिवूडमध्ये येऊन फार काळ झाला नाही. अगदीर बोटांवर मोजता येईल इतकेच त्याचे सिनेमे. पण साहेबांचा ...

अभिनेता सुशांत सिंह राजपूत बॉलिवूडमध्ये येऊन फार काळ झाला नाही. अगदीर बोटांवर मोजता येईल इतकेच त्याचे सिनेमे. पण साहेबांचा तोरा एखाद्या सुपरस्टारपेक्षा कमी नाहीच. सुशांत कायम ‘नो नॉनसेन्स रूल’ फॉलो करताना दिसतो. एखादी गोष्ट आवडली नाही की, तो अगदी लगेच रिअ‍ॅक्ट होतो. म्हणूनच काही लोक त्याला ‘शॉर्ट टेम्पर्ड’ही म्हणतात. सध्या सुशांत त्याच्या याच स्वभावामुळे चर्चेत आला आहे.खरे तर सुशांत एक प्रसिद्ध अभिनेता आहे. पण अलीकडे तो अगदी भर रस्त्यात एका ड्रायव्हरशी भिडला. गुरुवारी संध्याकाळी मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीजवळून जात असतानाच फिल्मसिटीच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडल्याचे कळते. एका दुसºया कार चालकाने सुशांतच्या कारला ओव्हरटेक करत यू टर्न घेतला. मग काय, सुशांतचा पारा एकदम चढला. सुशांतने तिथेच गाडी थांबवली अन् त्या ड्रायव्हरला शिवीगाळ करू लागला. सुशांत असा चढलेला पाहून ड्रायव्हरही संतापला. गाडीत बसलेली व्यक्ती एक लोकप्रीय अभिनेता आहे, याच्याशी काहीस सोयरसुतक नसलेल्या या ड्रायव्हरनेही सुशांतला त्याच्याच भाषेत उत्तर दिले. सुशांत आणि त्या ड्रायव्हरमध्ये अशी जुंपलेली पाहून क्षणात तिथे मोठी गर्दी जमली. अर्थात अद्याप सुशांतने याबद्दल काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. अलीकडे आयफा पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार न मिळाल्याने सुशांत दुखावला गेला होता. सोशल मीडियावर त्याने आपली ही नाराजी बोलून दाखवली होती.  सध्या सुशांत 'चंदा मामा दूर के' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यासाठी त्याने नासामध्येही रितसर प्रशिक्षण घेतलं असून, तो अनुभव अविस्मरणीय होता, असे त्याने स्पष्ट केले आहे.