बॉलीवुडमध्ये काहीजण प्रसिद्धीसाठी इतके काही आसुसलेले असतात की त्यांना कशाचंही भान राहत नाही... मात्र अति केलं तिथं माती तर होणारच नाही का... अशीच काहीशी अवस्था झालीय हॉट बेब शर्लिन चोपडाची..त्यामुळं.शर्लिन तुने क्या किया असं तिचे फॅन्स म्हणतायेत. सारं वातावरण ख्रिसमसच्या रंगात न्हाऊन गेलंय...प्रत्येकजण विशेष हटके पद्धतीने सोशल मीडियावर शुभेच्छा देताना पाहायला मिळतोय. यात सेलिब्रेटीही मागे नाहीत. मात्र या सगळ्यांमध्ये सध्या शर्लिन चोप्राने सा-यांचे लक्ष वेधले आहे.
ख्रिसमस शुभेच्छा देण्यासाठी तिने एक खास फोटोशूट केले. या फोटोत ती सांताक्लॉजच्या रूपात पाहायला मिळत असली तरी हे सगळे सेक्सी लूकमध्ये तिने आपले फोटोशूट केले आहे.शर्लिन चोप्रा आपल्या फॅन्ससाठी काही नवीन व वेगळे करण्यासाठी काही ना काही मनोरंजक गोष्टी करत असते, ह्यावेळी शर्लिनने सॅन्टाच्या वेषभुश्या सारख्या कपड्यांमध्ये सर्दीमध्येही सोशल मीडियावर आपल्या हॉट आणि सेक्सी अदांमुळे आग लावल्याचे पाहायला मिळत आहे.हे फोटो पाहाताच मात्र नेटीकरी तिच्यावर चांगलेच संतापल्याचेही पाहायला मिळत आहे. या फोटोंवर अक्षरक्षः शाब्दीक शिव्यांचा भडीमार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पब्लिसिटी मिळवण्यासाठी शर्लिनचा हा खटाटोप तिची चांगलीच डोकेदुखी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.
कामसूत्रच्या थ्रीडी सिनेमात शर्लिनच्या मादक अदा पाहायला मिळणार होत्या... मात्र याच सिनेमातून शर्लिनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. या सिनेमासाठी तिच्यावर चित्रीत करण्यात आलेला अर्धनग्न व्हिडिओ निर्माता-दिग्दर्शकाच्या परवानगीशिवाय शर्लिननेच यूटय़ूबवर टाकल्यामुळे वाद निर्माण झाला होता.