Join us  

OMG : ​स्वत:चे घर सोडून शाहिद कपूर का राहतोय भाड्याच्या हॉटेलमध्ये !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2017 10:14 AM

शाहिद कपूरने आपले घर सोडले असून तो आता गोरेगावच्या एका हॉटेलमध्ये राहत आहे. बॉलिवूडचे असे अनेक स्टार्स आहेत, जे ...

शाहिद कपूरने आपले घर सोडले असून तो आता गोरेगावच्या एका हॉटेलमध्ये राहत आहे. बॉलिवूडचे असे अनेक स्टार्स आहेत, जे स्वत:चे घर असूनही दुसऱ्याच्या घरात शिप्ट होतात. मात्र शाहिद घराऐवजी एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत आहे. बहुतेकजण घरात भांडण झाल्याने किंवा इतर कारणाने घर सोडतात, मात्र शाहिदच्या घर सोडण्याचे कारण म्हणजे शूटिंगला जाताना आणि येताना होणारा ट्रॅफिकचा त्रास होय. पद्मावती या चित्रपटाचे शूटिंग सुरु असून या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहदेखील आहेत. हे कलाकारदेखील फिल्म सिटीच्या जवळच राहू लागले आहेत. घरापासून शूटिंगच्या ठिकाणी पोहचण्यात शाहिदला आपला वेळ वाया घालवायचा नाही म्हणून त्याने हा निर्णय घेतला आहे. म्हणून शुटिंग संपेपर्यंत शाहिद याच हॉटेलमध्ये राहणार आहे. शाहिदला शूटिंग ठिकाणी पोहचायला आणि पुन्हा घरी वापस यायला सुमारे ४ तास वाया जायायचे. आता मात्र तो रोज सकाळी लवकर शुटिंग ठिकाणी पोहचतो आणि रात्री उशिरापर्यंत शूट करतो. या चित्रपटात शाहिद दोन लुकमध्ये दिसणार असून त्यासाठी त्याला वर्कआउटदेखील करावे लागते.   चित्रपटाच्या रिलीजसाठी सुरुवातीलाच आलेल्या अडचणींमुळे प्रोजेक्टच्या शेड्यूलला अगोदरच उशिर झाला आहे. हा चित्रपट १७ नोव्हेंबरला चित्रपट गृहात येण्याची शक्यता आहे.  Also Read : ​शाहिद कपूर म्हणतो, स्टार नाही, सुपरस्टार म्हणा!!