OMG!! शाहरूख खानचे ‘स्टारडम’ धोक्यात तर नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 10:29 IST
शाहरूख खानचा ‘जब हॅरी मेट सेजल’ आणि अर्जुन कपूरचा ‘मुबारकां’ या दोन चित्रपटांचा बॉक्सआॅफिसवर ‘मुकाबला’ रंगला होता. या संघर्षांत ...
OMG!! शाहरूख खानचे ‘स्टारडम’ धोक्यात तर नाही?
शाहरूख खानचा ‘जब हॅरी मेट सेजल’ आणि अर्जुन कपूरचा ‘मुबारकां’ या दोन चित्रपटांचा बॉक्सआॅफिसवर ‘मुकाबला’ रंगला होता. या संघर्षांत कुठला चित्रपट सरल ठरला असेल? होय, मुबारकां. अर्जुन कपूरच्या ‘मुबारकां’ने शाहरूख खानच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ला केवळ तगडी फाईटच दिली नाही तर, दुसºया आठवड्यात चारी मुंड्या चीत केले. ‘जब हॅरी मेट सेजल’ने एकूण ६१.०५ कोटींची कमाई केली. हा चित्रपट बनावायला ८० कोटी लागलेत. म्हणजेच, चित्रपटाची लागतही वसूल होऊ शकली नाही. दुस-या आठवड्यात शाहरूखच्या ‘जब हॅरी मेट सेजल’कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. चित्रपटाने दुसºया आठवड्यात कसेबसे २.८५ कोटी कमावले. याऊलट ‘मुबारकां’ने यादरम्यान ६.०८ कोटींची कमाई केली. रिलीजच्या आठव्या, नवव्या आणि दहाव्या दिवशी ‘मुबारकां’ने ‘जब हॅरी मेट सेजल’च्या तुलनेत अधिक कमाई केली. शाहरूखच्या चित्रपटाने आठव्या दिवशी १.०५ कोटी, नवव्या दिवशी २ कोटी आणि तिसºया दिवशी ३.०३ कोटी रुपए कमावले. दुसºया वीकेंडमध्ये ‘मुबारकां’चे काही शो हाऊसफुल राहिलेत. मात्र ‘जब हॅरी मेट सेजल’ ठप्प पडला.इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब हॅरी मेट सेजल’ एकूण ३१०० स्क्रीन्सवर रिलीज झाला होता. याऊपर पहिल्या तीन दिवसांत चित्रपटाला ५० कोटींचा आकडाही गाठता आला नाही. फर्स्ट वीकेंडमध्ये चित्रपटाने ४५.७५ कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटाने केवळ समीक्षकांनाच नाही तर शाहरूखच्या चाहत्यांनाही निराश केले. एकंदर काय तर, बॉक्सआॅफिसवर अर्जुन कपूरने शाहरूखला चांगलेच पछाडले. काही जण, ही शाहरूखसाठी धोक्याची घंटा मानून चालत आहेत. इतकेच नाही तर शाहरूखचे स्टारडम धोक्यात तर नाही? असा प्रश्न अनेकांना छळू लागला आहे.