OMG : सैफ अली खान का नाराज झाला करण जोहरवर ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2017 16:45 IST
आयफा 2017चे अॅवॉर्डस वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत राहिले. कधी सलमान खान आणि कॅटरिनामधील वाढलेली जवळीकता तर कधी आयफाच्या मंचावर कंगनाची ...
OMG : सैफ अली खान का नाराज झाला करण जोहरवर ?
आयफा 2017चे अॅवॉर्डस वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत राहिले. कधी सलमान खान आणि कॅटरिनामधील वाढलेली जवळीकता तर कधी आयफाच्या मंचावर कंगनाची उडवली गेलेली खिल्ली. यापलिकडे जाऊन आणखीन एक आयफादरम्यान घडलेला किस्सा आता समोर येतो आहे. तुम्ही ऐकून हैराण व्हाला. भले ही आयफाच्या स्टेजवर सैफ अली खान आणि करण जोहर यांची केमिस्ट्री दिसली तरी आतली बातमी काही वेगळीच आहे. आयफा संपल्यावर सैफ आणि करणमधले संबंध काहीसे बिघडले आहेत. आयफा अॅवॉर्डसमध्ये हजेरी लावलेल्या एक कलाकारांने सांगितले की, करण आणि सैफ कार्यक्रम एकत्र मिळून होस्ट करत होते या दरम्यान करणने असे काही तरी केले की ज्यामुळे सैफ त्याच्यावर नाराज झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सैफ आणि करणने आयफाच्या होस्टिंगची रिहर्सल चांगल्या पद्धतीने केली होती. दोघांनी ही माहिती होते कुणाला कोणानंतर बोलायचे आहे. दोघांना समान भागात जबाबदारी वाटून दिली होती. मात्र स्टेजवर गेल्या करणने काही आपल्या मनाच्या ओळी म्हणायला सुरुवात केली ज्यामुळे सैफ नाराज झाला. घडलेला किसा सैफने आपल्या एका मित्रासोबत शेअर केला. हळूहळू ही गोष्टी करण जोहरच्या कानापर्यंत जाऊन पोहोचली.ALSO RAED : आयफाच्या मंचावर ‘जोक्स’वर ‘जोक्स’! कंगना राणौत देणार का उत्तर? करणच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की करण गेल्या अनेक वर्षांपासून अॅवॉर्ड सोहळ्यांचे अँकरिंग करत आहे. त्यामुळे स्टेजवर गेल्यावर तो इतका कम्फर्टेबल होतो की कधी तो आपल्या मनाने ओळींमध्ये अनेक बदल करतो. ज्यामुळे त्याच्यासोबत असलेला को-होस्ट थोडासा अडचणीत येतो. पण मला नाही वाटत करणने हे जाणून बूजुन सैफला त्रास देण्याच्या हेतुने केले असेल. ऐकूणच काय या वर्षीचे 'आयफा 2017' या ना त्या कारणामुळे सतत चर्चेत राहिले.