Join us  

बाबो..! प्रियांका चोप्रा चक्क न्यूयॉर्कमध्ये विकतेय 'मुंबईचा वडापाव', एका वडापावची किंमत ऐकून सुटेल तुम्हाला घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 3:27 PM

काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्राने अमेरिकेत स्वतःचे भारतीय रेस्टॉरंट सुरू केले आहे. न्यूयॉर्क शहरात असलेल्या या रेस्टॉरंटचे नाव आहे सोना.

बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर फक्त बॉलिवूडमध्येच नाहीतर हॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहेत. तिचे जगभरात खूप चाहते आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्राने अमेरिकेत स्वतःचे भारतीय रेस्टॉरंट सुरू केले आहे. न्यूयॉर्क शहरात असलेल्या या रेस्टॉरंटचे नाव आहे सोना. या रेस्टॉरंटच्या मेन्यूकार्डवर भारतीय पदार्थांची मोठी यादी पहायला मिळेल. यात पानीपुरी, डोसा, कुल्चा या सारख्या पदार्थांचा समावेश आहे. मात्र आता प्रियांका पुन्हा एकदा रेस्टॉरंटमधील एका मेन्यूमुळे चर्चेत आली आहे. हा पदार्थ म्हणजे मुंबईचा वडापाव. 

हो. खरं आहे. प्रियंका चोप्राच्या सोना रेस्टॉरंटमध्ये वडापावदेखील मिळतो. मात्र एका वडापावची किंमत ऐकून तुम्ही चक्रावून जाल. या वडापावची किंमत १४ अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनात साधारण १ हजार रुपये इतकी आहे. मुंबईमध्ये सर्वांचा आवडीचा असणारा वडापाव आता सातासमुद्रापार जाऊन प्रियांकाच्या उपहारगृहाद्वारे अमेरिकेच्या लोकांच्या मनावरही राज्य करत आहे. 

प्रियांका चोप्राच्या या रेस्टॉरंटमध्ये अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली आणि तिथल्या पदार्थांची चव चाखून त्यांचे कौतुकही केले आहे. प्रसिद्ध निर्मात्या आणि थिएटर आर्टिस्ट लोला जेम्स यांनी नुकतेच प्रियांकाच्या सोना रेस्टॉरंटला भेट दिली.

तिथे लोला जेम्स यांनी भारतीय पदार्थांची चव घेतली. यात त्यांनी मुंबईची ओळख असलेला वडापाव खाल्ला. शिवाय त्यांनी भेळ, चाट आणि इतरही पदार्थांचा आस्वाद घेतला. आपल्या अनुभवाबद्दल सांगताना त्यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी या फोटोंना कॅप्शन देत म्हटले की, ‘सोना न्यूयॉर्क अप्रतिम आहे, यात काहीच आश्चर्य नाही. प्रियांका चोप्रा याबाबतीत कधीच चुकत नाही.’

टॅग्स :प्रियंका चोप्रा