Join us  

OMG : ​सचिन तेंडुलकरचा चित्रपट पाहून अमिताभ बच्चन बोलले असे काही..!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2017 11:56 AM

क्रिकेटचा देव म्हणून सर्व जगतात ज्याची ख्याती आहे, असा सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावरील बायोपिक ‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’च्या भव्य प्रीमियरमध्ये ...

क्रिकेटचा देव म्हणून सर्व जगतात ज्याची ख्याती आहे, असा सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावरील बायोपिक ‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’च्या भव्य प्रीमियरमध्ये सुपरस्टार शाहरुख खान, आमिर खान आणि बच्चन परिवारासमवेत कित्येक दिग्गज बॉलिवूड व क्रिकेट जगतातील सेलिब्रिटींचा समावेश होता. या विशेष प्रसंगाचे सुंदर फोटो अमिताभ बच्चनने आपल्या ट्विटरवर पोस्ट केले आहेत. या फोटोंपेक्षा सुंदर आहे अमिताब बच्चनने केलेले वक्तव्य. फोटो पोस्ट करताना अमिताभने लिहिले आहे की, ‘बीती रात ‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’ देखने के बाद गर्व और इमोशन से भर गया। मैं उस देश का वासी हूं, जिस देश में सचिन बहता है।’}}}}२६ मे रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचा आज झालेल्या प्रीमियर शोमध्ये क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वातील दिग्गजांनी खूप मोठा आंनद घेऊन जल्लोष केला.