Join us

OMG!! हर्षवर्धन कपूरच्या पोस्टमधील ‘ती’ मिस्ट्री गर्ल सारा अली खान तर नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2017 11:58 IST

अनिल कपूरचा लाडका मुलगा हर्षवर्धन कपूर सध्या चर्चेत आहे, तो त्याच्या लव्हलाईफमुळे. होय, हर्षवर्धन व सैफ अली खानची मुलगी ...

अनिल कपूरचा लाडका मुलगा हर्षवर्धन कपूर सध्या चर्चेत आहे, तो त्याच्या लव्हलाईफमुळे. होय, हर्षवर्धन व सैफ अली खानची मुलगी सारा अली खान या दोघांच्या डेटींगच्या बातम्यांची सध्या सर्वाधिक चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन व सारा या दोघांना एका रेस्टारंटमध्ये एकत्र पाहिले गेले होते. मीडियातील बातम्या खºया मानाल तर रेस्टारंटमध्ये दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ बसले होते. परस्परांना बेबी म्हणून हाक मारत होते. तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी खिचडी पकतेय,असे मानले जात आहे. आता यात आणखी भर पडली आहे ती एका मिस्ट्री गर्लच्या पोस्टची.खुद्द हर्षवर्धनने आपल्या सोशल अकाऊंटवर एका मिस्ट्री गर्लचा फोटो पोस्ट केला आहे. याचे कॅप्शन बरेच काही सांगणारे आहे. या फोटोत मुलीचा चेहरा तर दिसत नाहीय. पण फोटोमधील मुलगी सारासारखी वाटतेय. सगळे जण फोटोतील ब्युटिफुल गर्ल सारा अली खान हीच असल्याचे सांगत आहेत. हर्षने या फोटोला चांगलेच गर्भित कॅप्शन दिले आहे. ‘आपल्या रोजच्या आयुष्यात सुंदर क्षण निवडा आणि त्यापासून प्रेरणा घ्या. या सुंदर क्षणांना विसरू नका तर एक गोड आठवण बनवून नेहमी स्वत:जवळ ठेवा,’असे त्याने लिहिलेय. ALSO READ : ​हर्षवर्धन कपूर आता बनणार शूटर!हर्षवर्धनच्या या पोस्टनंतर त्याच्या व साराच्या डेटींगच्या बातम्यांना जरा जास्तच ऊत आला. मग काय, हे पाहून हर्षवर्धनने ही पोस्ट डिलिट केली. पण तोपर्यंत त्याची खबर कानोकानी पोहोचली होती. अलिकडे करिना कपूर खानचा मुलगा तैमूर याच्या जन्मावेळी हर्षवर्धन सैफ व करिनाच्या घरी अनेकदा जाता येताना दिसला होता.