Join us  

OMG : अक्षय कुमार म्हणतो, ट्विंकल खनाला आमचे फॅमिली डॉक्टरही घाबरतात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2018 11:14 AM

अक्षय कुमार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान पत्नी ट्विंकल खानाच्या काही गोष्टींवरुन पडद्या उचलला आहे. अक्षय म्हणाला ट्विंकलचे कोणतेही वायफळ ...

अक्षय कुमार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान पत्नी ट्विंकल खानाच्या काही गोष्टींवरुन पडद्या उचलला आहे. अक्षय म्हणाला ट्विंकलचे कोणतेही वायफळ वक्तव्य हेडलाईन बनून जाते असे अक्षय कुमार या प्रमोशन दरम्यान म्हणाला आहे. अनेकदा घरीसुद्धा मी ट्विंकलच्या अशाच वक्तव्यांनी घेरलेला असतो. तुम्ही विचार नाही करु शकतं आमच्या घरात काय होत ते पण यामुळे मला प्रत्येक दिवशी काही तरी नवीन शिकायला  मिळते. ट्विंकल खूप अभ्यास करते त्यामुळे सगळ्या नव्या गोष्टींचे ज्ञान तिला असते.  ऐवढ्यावरच अक्षय थांबला नाही तर अक्षय पुढे म्हणाला मी तुम्हाला आणखीन एक गमतीदार किस्सा सांगतो, जेव्हा कधी आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरकडे जातो, त्यावेळी डॉक्टर एखादी गोष्ट सांगत असेल तर ट्विंकल त्यांना आपले ज्ञान आणि माहिती देऊन हैराण करुन टाकते. त्यामुळे डॉक्टरही ट्विंकलला घाबरतात. त्यानंतर डॉक्टर मला म्हणतात पुढच्या वेळी एकटा ये, पत्नीला घेऊन येऊ नकोस. 'पॅडमॅन’ चित्रपटाच्या माध्यमातून  ट्विंकल खना  निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, राधिका आपटे आणि  सोनम कपूरच्या मुख्य भूमिकेत आहेत.चित्रपटात राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे; तर सोनम अक्षयवर प्रेम करत असल्याचे दाखवण्यात येणार आहे. महानायक अमिताभ बच्चन हेदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पॅडमॅन या चित्रपटात अरुणाचल मधील मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष आणि स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे. या ट्रेलरमध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने पॅड बनवताना दिसत आहे. पण हा त्याचा प्रयोग त्याच्या पत्नीला म्हणजेच राधिका आपटेला रुचलेला नाहीये. त्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर सोनम त्याला या त्याच्या प्रयोगात मदत करताना आपल्याला दिसत आहे. ALSO RAED  :  अक्षयकुमारने पत्नी ट्विंकल खन्नाला अशा अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळख मिरवणाºया अक्षय कुमारने मागील काही वर्षांपासून सामाजिक विषयाला वाहिलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून समीक्षकांचे लक्ष वेधले आहे. या दरम्यान त्याने काही वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. त्याचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपटदेखील याच पठडीतला चित्रपट आहे.