Join us  

'आम्हाला अजून गावात कुणीच स्वीकरलं नाही', जातीव्यवस्थेचा बळी ठरलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीने व्यक्त केली खंत

By तेजल गावडे | Published: October 09, 2020 4:59 PM

मुळचा उत्तर प्रदेशातील असणाऱ्या नवाझने असे सांगितले की, त्यांच्या आजीच्या जातीमुळे अजूनही त्याच्या गावातील काही लोकांनी त्यांचा स्वीकार केला नाही आहे.

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली छाप उमटविणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी उत्तर प्रदेशमधील एका छोट्याशा गावातील आहे. त्याचे म्हणणे आहे गावात जाती व्यवस्था आजही कायम आहेत. चित्रपटात नाव आणि आदर मिळवल्यानंतरही त्याच्यासोबत भेदभाव झाला आहे. त्याने हाथरसमधील घटना खूप खेदजनक असल्याचे म्हटले आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, माझी आजी खालच्या जातीची होती, तर माझे संपूर्ण कुटुंब शेख होते. यामुळे गावातील लोक अजूनही माझ्या कुटूंबाकडे चांगल्या नजरेने पाहत नाहीत.' यावेळी नवाजने शहरी भागातील जातीय संस्कृती आणि ग्रामीण भागातील जातीय संस्कृती याबाबत भाष्य केले. तो असे म्हणाला की शहरी भागात जरी काही प्रमाणात जातीव्यवस्था गौण असली तरी ग्रामीण भागात त्याचा पगडा अजूनही पहायला मिळतो. एकाच समुदायामध्ये छोट्या-मोठ्या जातींमध्ये भेदभाव केला जातो.

तो पुढे म्हणाला की, या लोकांना काहीच फरक पडत नाही की तुम्ही बॉलिवूड अभिनेता आहात किंवा श्रीमंत. त्यांना फक्त जातीचंच पडलेले असते. सोशल मीडियाचा प्रभाव गावातील लोकांवर तेवढा नाही जेवढा शहरात आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीने हाथरस बलात्कार प्रकरण दुर्भाग्यपूर्ण म्हटले आहे आणि म्हटले की लोकांनी या विरोधात आवाज उठविला पाहिजे.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीहाथरस सामूहिक बलात्कार