Join us  

माझ्या मुलींची सुशांत सिंग राजपूतने मागितली होती माफी, नितिश भारद्वाज यांनी सांगितला किस्सा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 4:55 PM

नितिश भारद्वाज यांनी फेसबुकला एक फोटो शेअर केला असून त्यात सारा, सुशांत, नितिश आणि त्यांच्या दोन मुली आपल्याला दिसत आहेत.

ठळक मुद्देत्यासोबत त्यांनी लिहिले आहे की, 30 एप्रिल 2018 ला केदारनाथ चित्रपटाचे चित्रीकरण खोपोलीत सुरू होतं. अंडर वॉटर सीनची तयारी सुरू होती. माझ्या जुळ्या मुली देवयानी आणि शिवांजनी चित्रीकरण पाहाण्यासाठी माझ्यासोबत आल्या होत्या.

सुशांत सिंग रजपूतचे निधन 14 जानेवारी 2020 ला झाले. त्याच्या निधनाने त्याच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला. त्याच्या निधनाला आता एक वर्षं पूर्ण होतील. केदारनाथ या चित्रपटात नितिश भारद्वाज यांनी त्याच्यासोबत काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी सुशांतसोबत त्यांचे खूपच चांगले नाते निर्माण झाले होते. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नुकतीच सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला.

नितिश भारद्वाज यांनी फेसबुकला एक फोटो शेअर केला असून त्यात सारा, सुशांत, नितिश आणि त्यांच्या दोन मुली आपल्याला दिसत आहेत. त्यासोबत त्यांनी लिहिले आहे की, 30 एप्रिल 2018 ला केदारनाथ चित्रपटाचे चित्रीकरण खोपोलीत सुरू होतं. अंडर वॉटर सीनची तयारी सुरू होती. माझ्या जुळ्या मुली देवयानी आणि शिवांजनी चित्रीकरण पाहाण्यासाठी माझ्यासोबत आल्या होत्या. त्या दोघांची सुशांत आणि साराशी खूप चांगली मैत्री झाली होती. दोघींनी सुशांतला त्यावेळी सांगितले होते की, 6 मे ला आमचा वाढदिवस असतो. त्यावर सुशांतने मी तुम्हाला वाढदिवसाला फोन करून शुभेच्छा देईन, असे सांगितले होते. त्यामुळे दोघीही वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या फोनची वाट पाहत होत्या. पण सुशांतचा फोन काही आला नाही. मी मुलींना समजावलं की, तो बिझी असल्याने त्याच्या लक्षात आले नसेल. आम्ही जूनमध्ये चित्रीकरणासाठी भेटल्यावर सुशांतला याविषयी सांगितले.

सुशांतने लगेचच मला मुलींना फोन लावायला सांगितला. त्याने दोघींची माफी मागितली आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. तो त्यांच्या वयाचा होऊन त्यांच्याशी गप्पा मारत होता. शिवांजनीने लगेच त्याला माफ करून टाकलं. मात्र देवयानी ऐकायला तयार नव्हती. त्यामुळे त्याने तिला खूपच समजावलं. हा अनुभव मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत