Join us

निम्रत कौर एयरलिफ्ट' चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 11:23 IST

 नुकतीच तिने एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील अनेक कंगोरे उलगडले.प्रश्न -'लंच बॉक्स' पासून अभिनेत्री म्हणून तुझी ओळख निर्माण झाली. ...

 नुकतीच तिने एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील अनेक कंगोरे उलगडले.प्रश्न -'लंच बॉक्स' पासून अभिनेत्री म्हणून तुझी ओळख निर्माण झाली. त्यापूर्वीची निम्रत आम्हाला ठाऊक नाही. त्याबद्दल सांग काही..निम्रत : मी सरदारनी आहे. माझा जन्म राजस्थानमधील पिलानी येथे झाला. वडील भूपिंदर सिंग सैन्यात असल्यामुळे आम्हाला विविध शहरांत राहावे लागले. त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेण्याची सवय लागली. माझ्या वडिलांची बुद्धिमत्ता विलक्षण होती. त्यांनी आम्हाला कधीच आर्मी स्कूलमध्ये दाखल केले नाही. सामान्य शाळांमधील जीवन कळावे, हा त्यामागील उद्देश होता. मी हुशार असल्यामुळे मला कोणत्याही शाळेत सहजच प्रवेश मिळत गेला.जगातील कोणती व्यक्ती, ठिकाण तुला जास्त आवडते?निम्रत : माझी आई. माझ्यासाठी ती सर्व काही आहे, तिच्यामुळे मला मानसकि बळ मिळते. मी आज जे काही आहे, ती तिने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच. मला माझ्या आईचा अतिशय अभिमान आहे.बरं, प्रेमात कधी पडलीस?निम्रत : हो. प्रेमात पडली. .पण कुणा अभिनेत्यासोबत नव्हे. 'लंचबॉक्स' नंतर मी कधी कुणाशी जवळीक होऊ दिली नाही.आयुष्यात कधी, कोणते संकट मोठे वाटले?निम्रत : वडिलांचे निधन हा अतिशय दु:खाचा क्षण होता. दहशतवाद्यांनी वडिलांचे अपहरण केले. सात दिवसांतच त्यांची हत्या करण्यात आली. तेव्हापासून माझे जीवनच बदलले. सैन्याच्या सोयीसवलती अचानक बंद झाल्या. सामान्य आयुष्य जगताना थोडे दिवस अवघडल्यासारखे झाले पण नंतर सवय झाली. सैन्यातील परिचित मात्र मदतीला धावून येत. योगायोग म्हणजे वाढदिवसालाच वडिलांना 'शौर्यचक्र' जाहीर करण्यात आले. 'केन्स'मध्ये 'लंच बॉक्स' गेल्यानंतर मला अतिशय आनंद झाला. स्वत:चा अभिमान वाटला. मी दहा दिवस एकट्याने जाऊन काश्मिरात राहिले. मी नंतर माझ्या मनगटावर ' झेनब' असा टॅटू काढून घेतला. या शब्दाचा अर्थ असा की, वडिलांचा अतिशय मौल्यवान दागिना, जिने वडिलांचे नावे मोठे केले.