Join us

निहलानी म्हणाले, आम्ही का जाऊ? पोलीस स्वत:च येतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 18:13 IST

‘उडता पंजाब’ इंटरनेटवर लीक झाल्याची चित्रपट निर्मात्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. पायरसीच्या आरोपाचा इन्कार करताना सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख ...

‘उडता पंजाब’ इंटरनेटवर लीक झाल्याची चित्रपट निर्मात्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. पायरसीच्या आरोपाचा इन्कार करताना सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख पहलाज निहलानी म्हणाले, ‘चित्रपट आमच्याकडे येण्यापूर्वी एक तास आधी इंटरनेटवर आला होता.’ चौकशीच्या मुद्द्यावर बोलताना निहलानी म्हणाले, आम्ही का जाऊ, पोलीस स्वत:च आमच्याकडे येतील.’चित्रपट लीक झाल्याच्या प्रकरणात किमान २० लोकांवर संशय आहे. यामध्ये प्रॉडक्शन टीमपासून सेन्सॉर बोर्डाच्या कर्मचाºयांपर्यंतचे लोक सामील असण्याची शक्यता आहे.फँटम चित्रपटाच्या निर्मार्त्यानी सायबर क्राईमकडे बुधवारी रात्री कॉपीराईट चोरीची तक्रार केली आहे. त्यांच्या अनुसार सेन्सॉर बोर्डाकडे दिलेली कॉपी विविध तºहेने टोरँटो साईटवर गेली आहे. कोणत्याही चुकीच्या मार्गाने डाऊनलोडसाठी हे संकेतस्थळ प्रसिद्ध आहे.विविध संकेतस्थळांच्या अनुसार चित्रपटातील ४० मिनिटांच्या फुटेजच्या कोपºयात ‘सेन्सॉरसाठी’ असे लिहिले आहे आणि ते आॅनलाईनवर उपलब्ध आहे. दोन तास २० मिनिटांचा संपूर्ण चित्रपट डाऊनलोड वेबसाईटवर उपलब्ध आहे.