Join us  

मी काही गैरसमज दूर करू इच्छिते...!  सुशांतच्या बहिणीला लोकांनी केले ट्रोल, भाचीने दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 11:31 AM

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणावरून रोज नवे खुलासे होत असताना दुसरीकडे काही लोक सुशांतच्या कुटुंबालाही ट्रोल करत आहेत

ठळक मुद्देमी माझ्या मावशीबद्दल पसरवण्यात येत असलेले काही गैरसमज दूर करू इच्छिते, असे म्हणत मल्लिकाने एक पोस्ट केली आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणावरून रोज नवे खुलासे होत असताना दुसरीकडे काही लोक सुशांतच्या कुटुंबालाही ट्रोल करत आहेत. सुशांतच्या निधनानंतर सर्वप्रथम घटनास्थळी पोहाचलेली त्याची बहीण मीतू सिंग हिला काही लोकांनी लक्ष्य केले आहे. बहिण असूनही हिच्या चेह-यावर भाऊ गेल्याचे अजिबात दु:ख दिसत नाहीये, अशा शब्दांत काही लोकांनी मीतूला लक्ष्य केले. मीतू ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली असताना सुशांतची भाची मल्लिका सिंग हिने ट्रोलर्सला उत्तर दिले आहे. मी माझ्या मावशीबद्दल पसरवण्यात येत असलेले काही गैरसमज दूर करू इच्छिते, असे म्हणत मल्लिकाने एक पोस्ट केली आहे.

ती लिहिते, ‘तुम्ही कधी सायकॉलॉजीचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला ठाऊक असेल की, कधी कधी जबर धक्का बसलेली व्यक्ती तिच्या भावना व्यक्त करून शकत नाही. माझ्या मावशीसोबतही असेच काही झाले आहे. असे काही घडलेय, यावर ती विश्वासच करू शकत नाहीये. मामा गेल्याची बातमी सर्वात आधी तिला मिळाली. त्यामुळे सर्वप्रथम ती या धक्क्यातून गेली. वकीलांनी तिला तिथे उभे राहून तपास कसा सुरु आहे, यावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. पण ती तिथे पोहोचली आणि मामाला त्या अवस्थेत बघून बेशुद्ध पडली. मामाच्या अपार्टमेंटमध्ये खूप  महागडे सामान होते. मावशीला त्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. माझ्या मावशीनेख मामाला बाईक चालवणे आणि क्रिकेट खेळणे शिकवले होते. माझी ही मावशी सर्व भावंडांमध्ये सर्वाधिक खंबीर आहे. ती वारंवार फोन चेक करत होती. कारण ती आपल्या मुलीच्या काळजीत होती. मामाच्या मृत्यूची बातमी ऐकून तिची मुलगी ढसाढसा रडत होती. त्यामुळे ती मुलीला धीर देत होती. ती त्यावेळी केस सावरत होती. कारण केस तिच्या डोळ्यांवर येत होते. कॅमे-याच्या फॅशमुळे तिला त्रास होत होता. कारण आम्हाला कॅमे-यांची सवय नाही.'

'राहिली गोष्ट संदीप सिंग याची तर तो कौन हे आम्हाला ठाऊक नाही. मावशी मामूचा मृतदेह पाहून बेशुद्ध झाली त्यावेळी योगायोगाने संदीप सिंग तिथे हजर होता. त्याने तिला सावरले. पण ती त्याला ओळखत नव्हती. मी पुन्हा सांगू इच्छिते की, आमचे कुटुंब संदीप सिंग नावाच्या व्यक्तिला ओळखत नाही. माझ्या मावशीवर टीका झाली. माझ्या आजोबांच्या (सुशांतचे वडील) संस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले या पाच भावंडामधील प्रेम मी पाहिले आहे. आजी गेल्यानंतर सर्वांनी सुशांत मामूचा सांभाळ मी पाहिला आहे. प्लीज आमच्या कुटुंबाबद्दल वाट्टेल ते बोलणे बंद करा. आम्ही सर्व भावनिक शक्तीने लढत आहोत...'

 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत