Join us  

Exclusive : प्रियंका चोप्रा सांगतेय, या कारणामुळे निक जोनसला आवरले नव्हते त्याचे अश्रू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 6:23 PM

निक जोनसला रडू का कोसळले याविषयी प्रियंकाने नुकतेच सांगितले आहे.

ठळक मुद्देस्काय इज पिंक हा चित्रपट पाहून तो खूपच भावुक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याने लगेचच या चित्रपटाची दिग्दर्शक शोनाली बोसला फोन केला आणि या चित्रपटाने त्याच्या मनाला स्पर्श केला असे सांगितले.

देसी गर्ल प्रियंका चोप्रा तीन वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याससाठी सज्ज झाली आहे. प्रियंका शेवटची 2016 मध्ये आलेल्या  'जय गंगाजल' सिनेमात दिसली होती. प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये कधी कमबॅक करणार याची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात होते. ती लवकरच प्रेक्षकांना स्काय इज पिंक या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियंकासोबतच फरहान अख्तर, जायरा वसीम, रोहित सराफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

‘स्काय इज पिंक’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रियंकाचा पती निकची प्रतिक्रिया काय होती याविषयी तिने सांगितले. तिने म्हटले की, निकला मी या चित्रपट दाखवला त्यावेळी आम्ही इटलीत होतो. आम्ही सुट्टीवर असताना मी त्याला चित्रपट दाखवला होता. निकला हिंदी येत नाही. पण त्याने सबटाइटल्स वाचत हा चित्रपट पाहिला होता. हा चित्रपट पाहून तो खूपच भावुक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याने लगेचच या चित्रपटाची दिग्दर्शक शोनाली बोसला फोन केला आणि या चित्रपटाने त्याच्या मनाला स्पर्श केला असे सांगितले. त्याने म्हटले की, खूप छान चित्रपट तू बनवला आहेस. खूप छान कथा आहे. माझ्या डोळ्यात चित्रपट पाहाताना पाणी आले. मी कधी माझ्या भावना कोणालाही दाखवत नाही. 

 हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. प्रियंकाने यात एका टीनेजर मुलीच्या आईची भूमिका साकारली आहे.  झायरा यात टीनेजर मुलीच्या भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये एक भावनिक कथा सूत्र पाहायला मिळते. एकीकडे प्रियंका आणि फरहान अख्तरची प्रेमकहाणी आणि दुसरीकडे त्यांच्या मुलीला झालेला दुर्मिळ आजार अशी ही कथा आहे. मुलीच्या आजारापणाबद्दल प्रियंका व फरहानला समजते तेव्हा तिच्या उपचारासाठी दोघांचा संघर्ष सुरु होतो. यादरम्यान नवरा-बायकोच्या नात्यात आलेला दुरावा, वाद असे सगळे काही यात आहे. मुलगी हेच विश्व असलेल्या प्रियंकाने यात एका खंबीर आईची भूमिका साकारली आहे. 

सोनाली बोस हिने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. येत्या ११  ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास