या चित्रपटाचा पहिला भाग दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ मध्ये आला होता. त्यावेळी चित्रपटाने अनेक रेकॉर्ड नावावर करताना संबंध भारतवासीयांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण केले होते. त्यामुळे दुसºया भागात याचे उत्तरे मिळतील या अपेक्षेमुळे प्रेक्षकांना दुसºया भागाविषयी प्रचंड आतुरता आहे. त्यात सगळ्यात मोठी आतुरता म्हणजे, ‘कट्टपाने बाहुबलीला का मारले?’ या प्रश्नाची आहे. ‘बाहुबली-२’ हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज केला जाणार असून, ६५०० स्क्रीन्सवर एकाचवेळी रिलीज केला जाणार आहे. हाही एकच रेकॉर्ड आहे.#Baahubali2PreReleaseEvent .. Today at 6:30 PM, Live on #MaaMoviespic.twitter.com/uQPo22MnVP— STAR MAA (@StarMaa) March 26, 2017
New Poster Out : अंगावर शहारे आणणारे ‘बाहुबली-२’चे पहा नवे पोस्टर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2017 15:50 IST
‘बाहुबली-२’ या वर्षातला रिलीज होणारा असा चित्रपट आहे की ज्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. ही बाब चित्रपट निर्मातेदेखील ...
New Poster Out : अंगावर शहारे आणणारे ‘बाहुबली-२’चे पहा नवे पोस्टर!!
‘बाहुबली-२’ या वर्षातला रिलीज होणारा असा चित्रपट आहे की ज्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. ही बाब चित्रपट निर्मातेदेखील चांगल्या पद्धतीने जाणून असल्याने लोकांची उत्सुकता आणखी वाढविण्यासाठी दर आठवड्याला चित्रपटाशी संबंधित पोस्टर्स किंवा व्हिडिओ रिलीज करीत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर आउट केला अन् ट्रेलरनेच असा काही रेकॉर्ड केला की, ‘पिक्चर अभी बाकी है’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. दरम्यान, लोकांची उत्सुकता आणखी वाढविण्यासाठी या चित्रपटाशी संबंधित एक नवे पोस्टर आउट करण्यात आले असून, पोस्टरमध्ये प्रभासचा अंदाज अतिशय डॅशिंग असा दिसत आहे. आज सकाळीच चित्रपट निर्मात्यांनी हे पोस्टर सोशल मीडियावर आउट केले आहे. पोस्टरमध्ये चित्रपटात मुख्य भूमिका असलेला अभिनेता प्रभास युद्ध मैदानात असल्याचे दिसत आहे. पोस्टरमध्ये प्रभासने शरीराच्या वरच्या भागात युद्ध पोशाख परिधान केला असून, खारच्या भागात हिरव्या रंगाची धोती परिधान केलेली आहे. आज सायंकाळी या चित्रपटाचा प्री-रिलीज प्रोग्रॅमदेखील ठेवण्यात आला आहे. ज्यामध्ये लोकांना चित्रपटाशी संबंधित बराचसा मसाला बघण्यास मिळू शकतो. या प्रोग्रॅममध्ये चित्रपटाचा आॅडिओ लॉन्च केला जाणार आहे. }}}} ">http://