Join us  

नेहा शर्मा लवकरच दिसणार 'इललिगल २'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 5:04 PM

अभिनेत्री नेहा शर्माने 'इललिगल २' सीरिजमध्ये तिने निहारिका सिंगची भूमिका साकारली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा लवकरच इललिगल २मध्ये झळकणार आहे. या सीरिजमध्ये तिने निहारिका सिंगची भूमिका साकारली आहे. कोर्टरूम ड्रामा असलेल्या इललिगलच्या पहिल्या सीझनची समर्पक सांगता करतांना आदर्शवादी वकील असलेल्या ‍निहारिका सिंगचा विजय झाला. कथानकाचे उत्तम कथन आणि सर्वोत्कृष्ट  अभिनयामुळे या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. या शो चे टिकाकारांनी आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी कौतुक केले.  एक माजी मार्गदर्शक आणि विद्यार्थी यांच्यातील जुगलबंदी पुन्हा एकदा आपल्याला दिसणार असून यावेळी या दोघांच्या भोवती अनेक गोष्टी घडणार आहेत. यावेळी एकच प्रश्न राहतो तो म्हणजे न्याय होईल की सत्य दाबले जाईल?  हे पाहण्यासाठी वूट सिलेक्ट वर२५ नोव्हेंबर २०२१ इललिगल २ पाहा.      

नेहा शर्मा, पियुष मिश्रा, अक्षय ओबेरॉय , तनुज विरवानी, सत्यदिप मिश्रा, पारूल गुलाटी आणि अर्चित कौर यांचा अभिनय असलेल्या इललिगलचा हा दुसरा सीझन सुद्धा प्रेक्षकांचे मन जिंकेल. अश्विनी चौधरी  दिग्दर्शित आणि जगरनॉट प्रॉडक्शन्स निर्मित इललिगल सीझन २ वर्षातील सर्वांत मोठा कोर्टरूम ड्रामा ठरला आहे.

याबाबत नेहा शर्मा म्हणते “ स्क्रीन वर निहारिका सिंगची भूमिका करणे म्हणजे आव्हानात्मक भूमिका असूनही आनंददायी होती.  चुकीचे घडत असतांना ती त्या विरोधात आवाज उठवते आणि जरी बेकायदेशीर गोष्टींची शक्ती कितीही मोठी असली तरीही ती लढा देत राहते.  इललिगल २ मध्ये तिचा वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक लढा देऊन लोकांसमोर सत्य आणण्याचा लढा दर्शवण्यात आला आहे. आता प्रेक्षकांना आता कोर्टरूम मधील  थ्रीलर बरोबरच प्रवासातील ट्वीस्ट ॲन्ड टर्न्स पहायला मिळणार आहेत.” 

मार्गदर्शक- शिष्य यांच्यातील लढा होणार तीव्र

इललिगलच्या दुसर्‍या मोसमात मार्गदर्शक- शिष्य यांच्यातील लढा अधिक तीव्र होतांना दिसतो  यामध्ये निहारिका (नेहा शर्मा अभिनीत) मोठा धोका पत्करून स्वत:ची लॉ फर्म काढते आणि जनार्दन जेटली (पियुष मिश्रा अभिनीत) हे दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री बनण्याचे अभियान सुरू करतात. या कथानकात त्यांच्यातील शत्रूत्वा बरोबरच प्रेक्षकांना जटील अशा कायद्याच्या जगतातील गोष्टी, व्यवसाय आणि त्यांतील राजकारणही आपल्याला पहायला मिळणार आहे.  

टॅग्स :नेहा शर्मा