Join us  

ही माझी चॉईस...! नेहा धूपियाने शेअर केला ‘पाच’ बॉयफ्रेन्डचा ‘एक’ फोटो’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 10:14 AM

लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ट्रोलर्सला लगावला टोला...

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी नेहाचा एक व्हिडीओ आणि या व्हिडीओतील तिचे वक्तव्य वादात सापडले होते. 

बॉलिवूडच्या क्यूट कपल्सपैकी एक असलेल्या नेहा धूपिया आणि अंगद बेदी या दोघांनी कालच आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. लॉकडाऊनमुळे हा वाढदिवस फार धुमधडाक्यात साजरा होऊ शकला नाही, हे खरे. पण नेहा व अंगदने आपल्यापरिने हा दिवस खास बनवला. आपल्या बेधडक वागण्याबोलण्यासाठी ओळखल्या जाणा-या नेहाने आपल्या नवरोबाला खास अंदाजात लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यादरम्यान तिने आपल्या एका वादग्रस्त विधानाची पुन्हा आठवण करून दिली.

होय, मुलीने किती बॉयफ्रेन्ड ठेवावेत, ही तिची मर्जी, असे वक्तव्य अलीकडे नेहाने एका शोमध्ये केले होते. यावरून ती प्रचंड ट्रोल झाली होती. लग्नाच्या वाढदिवशी नव-याला विश करताना नेहाने या वादग्रस्त वक्तव्याची पुनरावृत्ती केली.नेहाने अंगदसोबतचे काही फोटो शेअर करत, एक खास कॅप्शन दिले. तिच्या या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले. ‘हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी माय लव्ह, एकमेकांसोबतची दोन वर्षे... अंगद हा माझ्या आयुष्यातील प्रेम आहे. माझी सपोर्ट सिस्टिम आहे. एक उत्तम पिता आहे. माझा बेस्ट फ्रेन्ड आहे आणि मला त्रास देणारा रूममेट आहे. जणू मला एकाच व्यक्तित पाच बॉयफ्रेन्ड मिळालेत. ही माझी चॉईस आहे,’ असे नेहाने कॅप्शनमध्ये लिहिले.तिचे हे कॅप्शन ट्रोलर्ससाठी सणसणीत टोला होता, हे नव्याने सांगायला नकोच.

मुलीने किती बॉयफ्रेन्ड ठेवावेत, ही तिची मर्जीकाही दिवसांपूर्वी नेहाचा एक व्हिडीओ आणि या व्हिडीओतील तिचे वक्तव्य वादात सापडले होते. एमटीव्ही रोडिज या रिअ‍ॅलिटी शोमधील हा व्हिडीओ होता. शोची जज असलेल्या नेहाने एका स्पर्धकाला चांगलेच सुनावले होते. गर्लफ्रेन्डचे पाच बॉयफ्रेन्ड आहेत हे समजल्यावर मी तिच्या कानशिलात लगावली होती, असे या स्पर्धकाने सांगितले होते. त्याचे ते वाक्य ऐकून नेहा जाम बिथरली होती. मुलीने किती बॉयफ्रेन्ड ठेवावेत, ही तिची मर्जी, असे नेहाने यावर त्या स्पर्धकाला सुनावले होते. तिच्या या वक्तव्यावरून मोठी चर्चा रंगली होती. नेहा प्रचंड ट्रोल झाली होती.

टॅग्स :नेहा धुपिया