Join us  

​राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने वयाच्या साठाव्या वर्षी केले लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 10:37 AM

अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये यांनी अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी साठीच्या दशकापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी ये ...

अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये यांनी अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी साठीच्या दशकापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी ये तेरे घर ये मेरा घर, हू तू तू, शतरंज, खेल, पेज ३, जोधा अकबर, हमारी अधुरी कहाणी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. दिल चाहाता है या चित्रपटात त्यांनी सिद्धार्थच्या म्हणजेच अक्षय खन्नाच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यांनी चित्रपटांसोबतच मन, पिया का घर, ममता, उडान, देवों के देव महादेव यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी अभिनयासोबतच साहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केले आहे. एका बंगाली चित्रपटासाठी त्यांनी सत्यजीत रे यांना असिस्ट केले होते. सुहासिनी मुळ्ये यांना त्यांच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना पाच वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.सुहासिनी मुळ्ये या त्यांच्या अभिनयासाठी नेहमीच चर्चेत असतात. पण एका वेगळ्याच कारणांनी त्या काही वर्षांपूर्वी चर्चेत आल्या होत्या. सुहासिनी मुळ्ये या त्यांच्या व्यवसायिक आयुष्यासाठी नव्हे तर वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत आल्या होत्या. त्या अनेक वर्षं लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये होत्या. पण नव्वदीच्या दरम्यान त्यांचे हे नाते तुटले आणि त्या एकट्या राहू लागल्या. त्यानंतर त्यांनी अनेक वर्षांनंतर म्हणजेच २०११ मध्ये अतुल गुर्टू यांच्यासोबत लग्न केले. गुर्टू हे फिजिसिस्ट असून त्यांच्या पत्नीचे २००६मध्ये निधन झाले होते. अतुल गुर्टू आणि सुहासिनी मुळ्ये यांनी लग्न केले, त्यावेळी सुहासिनी या ६० वर्षांच्या होत्या. सुहासिनी आणि अतुल यांची ओळख फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटद्वारे झाली होती. अनेक महिने एकमेकांशी चॅटिंग केल्यानंतर त्या दोघांनी एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांच्या भेटीगाठीनंतर त्यांनी लग्न करायचे ठरवले. सुहासिनी मुळ्ये कधी लग्न करतील हे त्यांच्या कुटुंबियांना वाटलेच नव्हते. पण त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबियांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्यांच्या लग्नाला आता लवकरच सात वर्षं पूर्ण होणार आहेत.  Also Read : ​​विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळ्ये झळकणार चित्रपटात