Join us  

​रवीनाच्या चित्रपटाचे नाव मातृ नव्हे मातृ - द मदर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2017 11:30 AM

रवीना लवकरच एका चित्रपटात झळकणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. रवीना गेल्या कित्येक वर्षांपासून चित्रपटात झळकलेली नाही. तिने ...

रवीना लवकरच एका चित्रपटात झळकणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. रवीना गेल्या कित्येक वर्षांपासून चित्रपटात झळकलेली नाही. तिने दरम्यानच्या काळात इसी का नाम जिंदगी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. आता ती अशतर सैयद दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात झळकणार आहे. अशरत यांच्या आगामी चित्रपटाचे नाव मातृ असे ठरवले होते. पण आता या चित्रपटाचे नाव मातृ - द मदर असे असणार आहे. बोनी कपूर यांची निर्मिती असलेला मॉम हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. कोणत्याही दोन चित्रपटांच्या नावामध्ये सार्धम्य असल्यास त्या चित्रपटावरून वाद हा होतो. त्यामुळे या चित्रपटाच्या नावाचे मॉम या चित्रपटाच्या नावाशी सार्धम्य असल्याने या चित्रपटाच्या नावाच्या बाबतीत वाद होईल असे सगळ्यांनाच वाटत होते. पण असे काहीही न होता त्यांनी समंजसपणे या चित्रपटाचे नाव बदलण्याचे ठरवले. शीर्षकासोबतच या चित्रपटाच्या कथेतदेखील खूप साम्य आहे. मातृ - द मदर या चित्रपटात अहिंसा आणि बलात्कारपीडित महिलांची कथा पाहायला मिळणार आहे. या महिलाचा न्याय मिळण्यासाठीचा लढा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. तर मॉम या चित्रपटात श्रीदेवी एका आईची भूमिका साकारणार असून आई-मुलीच्या नात्यातील दुराव्याबाबत या चित्रपटात भाष्य करण्यात येणार आहे, या दोन्ही चित्रपटांची आई या नात्याभोवती फिरणार आहे. याबाबत अशतर सैयद सांगतात, "आम्ही आमच्या चित्रपटाचे नाव द मदर असे ठेवण्याचे ठरवले होते. पण या चित्रपटाचे शीर्षक आधीच एका चित्रपटाला दिले गेलेले असल्याने ते शीर्षक उपलब्ध नव्हते. तसेच बोनी कपूर मॉम नावाचा चित्रपट बनवत असल्याचे आम्हाला माहीत होते. त्यामुळे आमच्या चित्रपटाचे नाव मातृ द मदर असे ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतला. या चित्रपटाच्या नावासाठी आम्ही खूश आहोत."