Join us  

नागराज मंजुळे यांचा बहुप्रतिक्षित झुंड चित्रपट प्रदर्शित होणार या दिवशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 6:42 PM

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत झुंड या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे‘झुंड’ हा अमिताभ व नागराज यांचा सिनेमा विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. विजय बारसे यांनी गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांची फुटबॉल टीम बनवली होती.

सैराट, फँड्रीसारखे तगडे मराठी सिनेमे दिल्यानंतर मराळमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हिंदीत उडी घेतली आणि ‘झुंड’ या हिंदी सिनेमाची घोषणा झाली. अमिताभ बच्चन सारख्या महानायकाची या चित्रपटात वर्णी लागली. चित्रपट बनून तयार झाला. पण लॉकडाऊनमुळे अडकला. लॉकडाऊन उठला, पण यादरम्यान ‘झुंड’ कायद्याच्या कचाट्यात अडकला. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार असा प्रश्न नागराज यांच्या चाहत्यांना पडला आहे.

आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत झुंड या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसाशिवाय यासाठी कोणताच चांगला दिवस असू शकत नाही....झुंड हा चित्रपट 18 जूनला प्रदर्शित होणार आहे.

आज छत्रपती शिवाजी महाराज की जन्म तिथी से बेहतर कोई दिन ना होगा, ये बताने के लिये की "झुंड" थिएटर में '18 जून' को आ रही...

Posted by Nagraj Manjule on Friday, February 19, 2021

‘झुंड’ हा अमिताभ व नागराज यांचा सिनेमा विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. विजय बारसे यांनी गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांची फुटबॉल टीम बनवली होती. 'झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवणाऱ्या सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाची भूमिका साकारली आहे.

या सिनेमाच्या शूटिंगवेळी अनेक अडचणी आल्या. सतत शूटिंगच्या तारखांमध्ये बदल होत होता यामुळे अमिताभ यांचे कामाचे शेड्युअलही बिघडत होते. त्यामुळे अमिताभ यांनी हा सिनेमा करणार नसल्याचे नागराज मंजुळेला कळवले होते. निर्मात्यांकडून घेतलेले मानधनही अमिताभ यांनी परत केले होते. अमिताभ यांना परत सिनेमात आणण्यासाठी आमिर खानला मध्यस्ती करावी लागली होती.

टॅग्स :नागराज मंजुळेअमिताभ बच्चन