Join us

The Mummy Moment : गौरी खान आणि अबरामचा हा क्यूट फोटो तुम्ही बघितला काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2017 21:57 IST

आतापर्यंत आपण अनेकदा शाहरूख आणि अबरामचे फोटोज् सोशल मीडियावर बघितले आहेत; मात्र शाहरूखची पत्नी गौरी खान हिने आपल्या लाडक्यासोबतचा ...

आतापर्यंत आपण अनेकदा शाहरूख आणि अबरामचे फोटोज् सोशल मीडियावर बघितले आहेत; मात्र शाहरूखची पत्नी गौरी खान हिने आपल्या लाडक्यासोबतचा एक असा फोटो शेअर केला जे बघून फॅन्स अक्षरश: भारावून गेले आहेत. या फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे गौरीने दिलेले कॅप्शन होय. गौरीने यावेळी That moment when you get appreciated for being a good Mummy! हे कॅप्शन देऊन एकप्रकारे तिच्यातील आईपण दाखवून दिले आहे. वास्तविक गौरी तिच्या सोशल अकाउंटचा वापर केवळ आपला बिझिनेस प्रमोट करण्यासाठी करीत असते; मात्र यावेळेस तिने अबरामसोबतचा शेअर केलेला फोटो बघून तिचे फॅन्स आश्चर्यचकित झाले आहेत. फोटोमध्ये गौरी टेपने रॅप केलेली दिसत आहे. असे वाटतेय की, जणू काही तिला कोणी बांधून ठेवले आहे. अशा स्थितीतही ती चिमुकल्या अबरामला किस करत आहे. खरं तर टॉम क्रुझच्या ‘द मम्मी’चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे गौरीने स्वत:चा ‘मम्मी’ अवतार केला आहे. स्वत:ला टेपने गुंडाळून ती अबरामला किस करीत आहे. फोटो ओळीमध्ये गौरीने लिहिले की, ‘असा क्षण जेव्हा तुमची चांगली मम्मी म्हणून प्रशंसा केली जाते’. काही दिवसांपूर्वीच शाहरूखने अबरामचा स्पायडर मॅन लुकमधील एक फोटो शेअर केला होता. आता गौरीचा ‘द मम्मी’ लूक फोटो शेअर केल्याने अबराम हॉलिवूड चित्रपटांचा चाहता आहे, हे मात्र नक्की!