Join us  

आदित्य पंचोलीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 8:08 PM

अभिनेता-निर्माता आदित्य पंचोली विरोधात मुंबई पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. एएनआयने ट्विटरवर याबद्दल माहिती दिली.

अभिनेता-निर्माता आदित्य पंचोली विरोधात मुंबई पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. एएनआयने ट्विटरवर याबद्दल माहिती दिली. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्सोवा पोलिसांनी पांचोली विरोधात कलम ३७६, ३२८,३८४, ३४१, ३४२, ३२३, ५०६ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण १० वर्ष जुनं असल्यामुळे आदित्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी त्याच्याविरुद्धचे पुरावे गोळा करणं हे कठीण असणार आहे, असे पोलिसांनी सांगितलं.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पीडितेने केलेल्या तक्रारीमध्ये आदित्य पांचोलीने अनेकदा तिच्यावर बलात्कार केल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी तिने पांचोलीविरुद्ध लिखीत तक्रारही नोंदवली होती. पीडितेने आदित्यविरुद्ध गुन्हा दाखल करताना म्हटलं की, ती १७ वर्षांची असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. एवढंच नाही तर मदतीसाठी ती पोलिसांकडे गेली असता त्यांनी आदित्यला फक्त समज दिला आणि सोडून दिले.

आदित्य पंचोलीने तीसहून अधिक चित्रपटात काम केलं आहे. त्याचे जीवन खूप वादग्रस्त राहिले आहे. मुंबईतील जुहूतील एका पबमध्ये एका सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचाही आरोप आहे. २०१५ साली घडलेल्या या घटनेत आदित्यवर आरोप करण्यात आला होता की त्याने नशेमध्ये डीजेवाल्यासोबत वाद घातला होता आणि त्यानंतर सुरक्षारक्षकावर हात उचलला होता. 

टॅग्स :आदित्य पांचोली