Join us  

मल्टीटॅलेंट १५ बॉलिवूड कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2016 1:31 PM

शाहिद कपूर हा एक ग्रेट डान्सर आहे तर अक्षय कुमारने आपल्या करिअरची सुरुवात ही शेफपासून केली होती. हे  सर्वांना ...

शाहिद कपूर हा एक ग्रेट डान्सर आहे तर अक्षय कुमारने आपल्या करिअरची सुरुवात ही शेफपासून केली होती. हे  सर्वांना माहिती आहे. परंतु, बॉलिवूडमध्ये अन्यही असे कलाकार आहेत की, आपल्या अभिनयाबरोबरच इतरही टॅलेंट त्यांच्यात पाहावयास मिळते. आपल्या फेव्हरेट स्टारचे अभिनयाशिवायचे टॅलेट ऐकून, आपल्याला आश्चर्याचा धक्का असेल असे हे १५ बॉलिवूड  कलाकार आहेत.  त्याच्यावर ही एक नजर...अली जफर : अली जफरने आपल्या करिअरची सुरुवात ही संगीतकार म्हणून केली होती. पण त्याने चित्रपटातही काम केले. याशिवाय अली हा एका उत्कृष्ट असा पेंटर आहे.प्रियंका चोपडा :क्वांटिको या मालिकेत काम करणारी  प्रियंका चोपडाचे आज जागतिक पातळीवर नाव घेतले जाते.  तिने अख्तरचा चित्रपट ‘दिल धडकने दो’ च्या शीर्षक गीताला आपला आवाज दिलेला आहे.अक्षय कुमार :बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारने शेफ म्हणून आपले करिअर सुरु केले होते. तो घरामध्ये आजही आपल्या मुलांसाठी स्वयंपाक तयार करतो.नर्गिस  फाकरी :नर्गिस फाकरी चित्रपटात येण्याच्या अगोदर मॉडेलिंग करीत होती. ती एक चांगली रॅपर सुद्धा आहे, हे अजूनही खूप कमी लोकांना माहिती आहे.  क्वींस शहरात तिचे लहानपण गेले .रितेश देशमुख :रितेश देशमुख हा एक चांगला मिमिक्री आर्टीस्ट व इंटीरियर डिझायनर सुद्धा आहे. शाहरुख खान व गौरी खान यांच्या रेड चिली आॅफिस व करण जोहरच्या बांद्रा  येथील घराचे रितेशनेच इंटीरियर केले आहे.जुही चावला : जुही ही एक कथ्थक डान्सर व  शास्त्रीय गायकही आहे. ‘भूतनाथ’ या चित्रपटात तिने ‘चलो जाने दो’ या गाण्याला आपला आवाज दिलेला आहे.आमिर खान :आमिर हा अभिनयाशिवाय एक चांगला चेस प्लेअर सुद्धा आहे. त्याने ग्रॉण्डमास्टर विश्वनाथ आनंद सोबतही चेस खेळलेले आहे.विद्या बालन :विद्या ही एक चांगली मिमिक्री कलाकार सुद्धा आहे. तसेच तिला कविता लिहीण्याचाही छंद आहे.आलिया भट्ट : आलियाने आपल्या अभिनयाने खूप कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली ओळख तयार केली आहे. ती एक चांगली गायिका असून, ‘हाईवे’ चित्रपटात तिने एआर रहमानसाठी गीत गायले आहे.फरहान अख्तर : फरहान हा दिग्दर्शकासोबत अभिनेताही आहे.शिवाय  गायक सुद्धा आहे, त्याने अनेक गाणी लिहीली आहेत.श्रद्धा कपूर :श्रद्धा कपूरने २०१० मध्ये आपल्या अभिनय करिअरला सुरूवात केली.  तिने एक विल्लन मध्ये ‘तेरी गालिया’ं हे गीत गायले असून,  ते खूप हिट ठरले होते. ती ट्रेंड सिंगर असल्याचे ही खूप कमी जणांना माहिती आहे. लता मंगेशकर कडून तिने संगीताचे शिक्षण घेतलेले आहे.आयुषमान खुराना : आयुषमानने अनेक चित्रपटात काम केले आहे. याशिवाय तो गिटारही वाजवितो व गाणीही लिहीतो.शाहिद कपूर : बॉलिवूडमध्ये चॉकलेटी बॉयजची इमेज असणारा शाहिद कपूर हा सुद्धा एक ट्रेंड डॉन्सर आहे.सैफ अली खान :पटौदी घराण्याचा नवाब सैफ अली खान एक संगीतकार आहे. तो गिटार खूप चांगल्याप्रकार वाजवतो. सैफने अनेक स्टेज शो सुद्धा केलेले आहेत.रणदीप हुड्डा : बॉलिवूडमध्ये रणदीप हुड्डाची एक वेगळी ओळख आहे. तो एक चांगला पोलो प्लेअर असल्याचे हे खूप कमी जणांना माहिती आहे. त्याच्याजवळ सहा घोडे असून, तो पोलो क्लबचा मालक सुद्धा आहे.