Join us  

मुकेश अंबानी यांनी निता यांना 'अशी' घातली होती लग्नाची मागणी! जाणून व्हाल चकित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 5:29 PM

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची लव्हस्टोरी फिल्मी कथेपेक्षा कमी नाही.

आशियातील सर्वात श्रीमंत असलेलं जोडपं म्हणजे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी. दोघेही नेहमीच आपल्या रॉयल लाईफ आणि बिजनेसमुळे चर्चेत राहतात. नुकतेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी रोमांटिक डान्स केला होता. जामनगरमधील तीन दिवसांच्या बॅशच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी राज कपूर आणि नर्गिसचं आयकॉनिक गाणं प्यार हुआ इकरार हुआवर रोमँटिक परफॉर्मन्स दिला होता. त्यांचा हा डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता यातच त्यांचा प्रपोजचा किस्सा सध्या चर्चेत आला आहे. 

अनंत अंबानी यांचे आई-वडील मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची लव्हस्टोरी फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. या दोघांनी अनेकवेळा मुलाखतींमध्ये त्यांच्या प्रेमकथेचा रंजक प्रवास उघड केला आहे. अनेक वर्षांपूर्वी सिमी गरेवाल यांना दिलेल्या एका टीव्ही मुलाखतीत मुंबईतल्या ट्रॅफिकमध्ये मुकेश अंबानी यांनी लग्नासाठी प्रपोज केल्याचं सांगितलं होतं. याचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे.  

तर झालं असं होतं की, नीता आणि मुकेश अंबानी एकदा मुंबईतील पेडर रोडवरुन जात होते. संध्याकाळी जवळपास साडे सात वाजता रोडवर ट्रॅफिक होतं. एका सिग्नलवर कार थांबवत मुकेश अंबानींनी अतिशय फिल्मी अंदाजात नीता यांना प्रपोज केलं होतं. ट्रॅफिकमध्ये गाडी थांबवत 'नीता तू माझ्याशी लग्न करशील का? फक्त हो किंवा नाही म्हण. जोपर्यंत उत्तर देत नाही. तोपर्यंत गाडी पुढे जाणार नाही' असं मुकेश यांनी म्हटलं होतं.  त्यानंतर नीता यांनी आय विल...म्हणत मुकेश यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं.

 सिमी गरेवाल यांच्या मुलाखतीमध्ये प्रपोजचा किस्सा सांगताना नीता यांनी मुकेश यांना असंही विचारलं की 'मी नकार दिला असता तर काय केलं असतं?  तर तू मला तेव्हाच्या तेव्हा गाडीतून उतरण्यास सांगितलं असतं का? आणि तू तिथून निघून गेला असता का',  यावर उत्तर देताना मुकेश अंबानी म्हणाले, 'नाही, मी तुला तुझ्या घरी सोडलं असतं आणि त्यानंतर आपण मित्र म्हणून राहिलो असतो'. निता अंबानी आणि मुकेश यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

 

टॅग्स :नीता अंबानीमुकेश अंबानीसेलिब्रिटीदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट