‘द कपिल शर्मा शो’ वर ‘मुबारकाँ’ची टीम...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST
‘मुबारकाँ’ या आगामी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाची टीम अर्जुन कपूर, अनिल कपूर, इलियाना डिक्रूझ आणि इतर स्टारकास्ट हे अलीकडेच ‘द कपिल शर्मा शो’ या शोवर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. तेव्हा अनिल कपूर, अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूझ, कपिल शर्मा, किकू शारदा, भारती सिंग, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर या सर्वांनी सेटवर धम्माल-मस्ती केली. पाहा त्यांचे हे मजेदार फोटो....
‘द कपिल शर्मा शो’ वर ‘मुबारकाँ’ची टीम...
‘मुबारकाँ’ या आगामी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाची टीम अर्जुन कपूर, अनिल कपूर, इलियाना डिक्रूझ आणि इतर स्टारकास्ट हे अलीकडेच ‘द कपिल शर्मा शो’ या शोवर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. तेव्हा अनिल कपूर, अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूझ, कपिल शर्मा, किकू शारदा, भारती सिंग, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर या सर्वांनी सेटवर धम्माल-मस्ती केली. पाहा त्यांचे हे मजेदार फोटो....‘द कपिल शर्मा शो’ वर प्रमोशनसाठी आलेली ‘मुबारकाँ’ ची टीम. अनिल कपूर, अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूझ, कपिल शर्मा यांनी फोटोग्राफर्सना अशी स्टायलिश पोझ दिली. अनिल कपूर, अर्जुन कपूर आणि कपिल शर्मा हे या सेटवर असे गाण्यांवर मस्त डान्स करत होते. ‘काँटे नही कटते ये दिन ये रात’ हे अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातलं गाणं आठवतंय ना? याच गाण्यावर सेटवर अनिल कपूर आणि सुमोना यांनी डान्स केला. त्यांचा रोमँटिक अंदाज पाहून कुणालाही त्यांचा हेवा वाटेल. भारती सिंग म्हटल्यावर आपण हसून हसून लोटपोट होतो. मुबारकाँ ची टीम आली म्हणून ती सेटवर चक्क बँड बाजाच घेऊन आली. अनिल कपूरचं ‘राम लखन’ मधील फेमस गाणं ‘वन टू का फोअर’ या गाण्यावर किकू शारदाने अफलातून डान्स केला. चक्क हातात वन, टू, फोअर चे पोस्टर दाखवत असा धम्माल डान्स केला. मुबारकाँ मधील गाण्यावर चित्रपटाच्या संपूर्ण टीमने असा मनमुराद डान्स केला. द कपिल शर्मा शो या सेटवर चित्रपटाच्या टीमने फोटोग्राफर्सना अशी पोझ दिली.