Join us

​बच्चेकंपनीमुळे हिट ठरले ‘हे’ चित्रपट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 14:23 IST

-रवींद्र मोरे हा चित्रपट पाहू नये, तोच चित्रपट पाहावा, असे बंधने नेहमी मुलांवर लादली जातात. अशावेळी मुलांना नेहमी प्रश्न ...

-रवींद्र मोरे हा चित्रपट पाहू नये, तोच चित्रपट पाहावा, असे बंधने नेहमी मुलांवर लादली जातात. अशावेळी मुलांना नेहमी प्रश्न पडतो की, त्यांच्यासाठी नेमके कोणते चित्रपट बनलेले आहेत. आपल्या सिनेसृष्टीत असे खूपच कमी चित्रपट बनले आहेत, जे विशेषत: फक्त मुलांसाठी बनविण्यात आले आहेत. मात्र काही वर्षांचा विचार केला तर काही निवडक चित्रपट आहेत ज्यांना मुलांनी बॉक्सआॅफिसवर हिट बनविले आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबाबत... * आय एम कलामविशेषत: मुले म्हटले की, खेळणे-मस्ती करणे हे त्यांचे संपतच नाही. मात्र ‘आय एम कलाम’ या चित्रपटात अशा एका मुलाची कथा दाखविण्यात आली आहे, ज्याची फक्त एकच मागणी असते, ती म्हणजे शिक्षण. खूपच हाल अपेष्टा सहन करुन तो मुलगा आपले शिक्षण पूर्ण करतो. त्याला हे सर्व करण्याची प्रेरणा मिळते ती माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यापासून. तो मुलगा त्यांचे भाषण ऐकतो आणि त्यांच्यासारखेच बनण्याचा निश्चय करतो. विशेष म्हणजे तो मुलगा स्वत:चे नाव बदलून कलाम ठेवतो. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नील माधव पंडाने केले होते.  * स्टेनली का डब्बाअसे नेहमी म्हटले जाते की, मुले ही मुलेच राहतील. या चित्रपटात याच म्हणीनुसार कथा बनविण्यात आली आहे. ही एक दहा वर्षाचा मुलगा स्टेनलीची कथा आहे. स्टेनली शाळा सुरु होण्याअगोदरच शाळेत पोहोचतो, मात्र तो कधीच दुपारच्या जेवणाचा डबा शाळेत येत नाही. वर्गात त्याचे मित्र आनंदाचे डबा शेअर करतात. मात्र शाळेतील एक शिक्षक स्टेनली दुपारचा डबा आणत नाही म्हणून खूपच दु:खी असतो. तो शिक्षकही दुपारचा डबा आणत नाही आणि मुलांच्या डब्यातच जेवण करतो. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्तेने केले होते. चित्रपटात चाइल्ड आर्टिस्ट पार्थो गुप्तेने स्टेनलीची भूमिका साकारली होती.   * चिल्लर पार्टीचिल्लर पार्टीच्या नावावरुन लक्षात येते की, या चित्रपटात मुलांचा एक ग्रुप असेल. मात्र या चित्रपटात जो ग्रुप दाखविण्यात आला आहे, तो काही साधारण गु्रप नाही. चित्रपटाची कथा अशा चिल्लर पार्टीशी संबंधीत आहे, जी आपल्या कॉलनीच्या एका डॉगीला वाचविण्यासाठी आंदोलन करण्यासही तयार होतात. २०११ मध्ये आलेल्या या चित्रपटात दंगल फेम नितेश तिवारीने दिग्दर्शित केले आहे.  * द ब्लू अंब्रेलाया चित्रपटात एका गरीब मुलीची कथा दाखविण्यात आली आहे. ही मुलगी एका निळ्या रंगाच्या छत्रीच्या कारणाने आपल्या गावात प्रसिद्ध होते, मात्र एकेदिवशी ती छत्री हरवते. या चित्रपटाची कथा याच क्लायमेक्सच्या अवती-भोवती फिरते. २००५ मध्ये आलेल्या या चित्रपटाची कथा रस्किन बॉन्डच्या नावाने लिहिलेल्या कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट विशाल भारद्वाजने दिग्दर्शित केला होता.   * गट्टू हा चित्रपट एका अत्यंत हुशार मुलाची कथा आहे. हा मुलगा जरी गरीब आहे, मात्र याच्याजवळ वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना आहेत. हा मुलगा आपल्या काकाच्या दुकानावर काम करतो. पंतगबाजीची आवड असणारा गट्टू कोणत्याही परिस्थितीत आकाशात उडणाऱ्या काळ्या रंगाच्या पतंगाला कापण्याचा प्रयत्न करतो, ज्या पतंगाला कोणीच कापू शकले नाही. यासाठी तो काय-काय प्रयत्न करतो हे अत्यंत मनोरंजक पद्धतीने या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. २०१२ मध्ये आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राजन खोसाने केले होते.