Join us  

मौनी रॉय या व्यक्तीसोबत अडकणार लग्नबंधनात, मंदिरा बेदीच्या घरी झाली लग्नाची बोलणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 5:28 PM

सध्या मौनी तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे.ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

ठळक मुद्देमौनी सध्या दुबईस्थित बँकर सूरज नांबियारला डेट करतेय. मौनी आणि सुरज लवकरच लग्न करणार असून त्यांच्या लग्नाची बोलणी नुकतीच अभिनेत्री मंदिरा बेदीच्या घरी झाली.

मौनी रॉयला क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. छोट्या पडद्यावर मिळालेल्या यशानंतर ती मोठ्या पडद्याकडे वळली. तिने अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या मौनी तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे.ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

मौनी सध्या दुबईस्थित बँकर सूरज नांबियारला डेट करतेय. मौनी आणि सुरज लवकरच लग्न करणार असून त्यांच्या लग्नाची बोलणी नुकतीच अभिनेत्री मंदिरा बेदीच्या घरी झाली. मंदिरा आणि मौनी या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. मौनीच्या आईने आणि भावाने मंदिराच्या घरी जाऊन सुरजसोबत लग्नाची बोलणी केली. त्यांच्या लग्नाची तारीख ठरली असून ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. 

लॉकडॉऊनच्या काळात मौनी अनेक महिने दुबईत होती. दुबईत मौनीची बहीण पती व मुलांसोबत राहते. याचठिकाणी तिची सूरजसोबत ओळख झाली. मौनीने काही दिवसांपूर्वी आपले रिलेशनशिप इन्स्टाग्रामवर ऑफिशिअल केले होते. मौनीने काही महिन्यांपूर्वी सूरजसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. मात्र नंतर हा फोटो डिलीटही केला होता. इतकेच नाही तर मोनीने सूरज आणि त्याच्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला होता. यात तिने सूरजच्या आईवडिलांना मॉम आणि डॅड म्हटले होते.

मौनीने आपल्या करिअरची सुरुवात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती. पहिल्यांदा रन सिनेमातील एका गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून ती दिसली होती. त्यानंतर एकता कपूरच्या क्योंकी सास भी कभी बहू थी या मालिकेत तिला काम करण्याची संधी मिळाली. यानंतर मौनी 'नागिन', 'नागिन 2', 'कस्तूरी', 'जुनून-ऐसी नफरत' अशा मालिकेांमध्ये झळकली. 2018 मध्ये अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यानंतर ती रोमियो अकबर वाल्टर, मेड इन चायना सिनेमात दिसली. लवकरच ती अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट यांच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमात दिसणार आहे.

टॅग्स :मौनी राॅय