Join us  

Mouni Roy Video: घाई-घाईत घरी पासपोर्ट विसरुन एअरपोर्टवर पोहोचली मौनी रॉय, नेटिझन्स म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 1:51 PM

मौनी रॉयचा हा व्हिडिओ समोर आल्यावर सोशल मीडिया यूजर्स त्यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देऊ लागलेत.

टीव्हीपासून ते चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री मौनी रॉय नेहमी लाईमलाईटमध्ये  असते. मौनीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मौनी तिच्या लेटेस्ट व्हिडीओमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. मौनी रॉय एअरपोर्टवर दिसली आणि मात्र ती तिचा पासपोर्ट घरीच विसरली. मौनी रॉयचा हा व्हिडिओ समोर आल्यावर सोशल मीडिया यूजर्स त्यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देऊ लागलेत.  

पासपोर्ट घरीच विसरली मौनी सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मौनी रॉयचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मौनी रॉय एअरपोर्टवर दिसत आहे. यादरम्यान मौनी रॉय तिच्या बॅगेत काहीतरी शोधताना दिसली, त्यानंतर ती घरी विसरलेला पासपोर्ट शोधत असल्याचे समोर आले. हा सगळा प्रकार पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाला.  हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यूजर्स मौनी रॉयला ट्रोल करत आहेत.

मौनी रॉयच्या व्हिडिओवर एका यूजरने लिहिले आहे की, 'पासपोर्ट विसरली अशील  तर नागिन बनून आत जा. ' एका यूजरने लिहिले आहे की, 'पापाराझींना कॉल करण्याच्या प्रक्रियेत पासपोर्ट विसरली.' आणखी एका यूजरने लिहिले आहे की, 'मेक-अप सोडून काय करावे, बाकी काही आठवत नाही.'  मौनी रॉयने टीव्ही सीरियल 'नागिन'मध्ये काम केलं असून तिच्या भूमिकेवरुन लोक तिला आता ट्रोल करत आहेत. टीव्ही मालिकांमध्ये काम केल्यानंतर ती आता चित्रपटांमध्ये वळली आहे.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, मौनी रॉय लवकरच 'द व्हर्जिन ट्री'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात मौनी व्यतिरिक्त संजय दत्त, पलक तिवारी, सनी सिंग, आसिफ खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :मौनी राॅय