Morphed Photo : इंटरनेटवरील ‘या’ बिकिनी फोटोंमागील वास्तव तुम्हाला माहीत आहे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 16:18 IST
गेल्या कित्येक महिने नव्हे तर वर्षांपासून इंटरनेटवर व्हायरल होत असलेले बॉलिवूड अॅक्ट्रेसचे हॉट बिकिनी फोटोज् तुम्ही कदाचित बघितले असतील. ...
Morphed Photo : इंटरनेटवरील ‘या’ बिकिनी फोटोंमागील वास्तव तुम्हाला माहीत आहे काय?
गेल्या कित्येक महिने नव्हे तर वर्षांपासून इंटरनेटवर व्हायरल होत असलेले बॉलिवूड अॅक्ट्रेसचे हॉट बिकिनी फोटोज् तुम्ही कदाचित बघितले असतील. दीपिका पादुकोण, विद्या बालन, कॅटरिना कैफ अशा प्रसिद्ध अभिनेत्रींचे कधी बघितले नसतील असे ते फोटोज् असल्याने त्यांचे फॅन्स नक्कीच चक्रवाले असतील यात शंका नाही; मात्र या फोटोंमागील वास्तव काही औरच असल्याने तुम्ही बघत असलेले फोटोज् खरे नाहीत, हे मात्र नक्की. या फोटोंमागील नेमके वास्तव काय हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बॉलिवूड अभिनेत्रींनी आत्मविश्वास आणि अभिनयाच्या जोरावर जगभरात स्वत:चा लौकिक निर्माण केला आहे; मात्र अशातही त्यांना काही घटनांमुळे अडचणींचा सामना करावा लागला. कारण बºयाचदा सेलिब्रिटींची पॉप्युलॅरिटी त्यांच्यासाठी अडचणीत आणणारी असते. बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध अभिनेत्रींनाही असेच अडचणीत आणून त्यांची छबी खराब करण्याचा प्रयत्न केला गेला. फोटोशॉप आणि काही सॉफ्टवेअरच्या मदतीने त्यांचे असे काही फोटोज् इंटरनेटवर व्हायरल केले गेले ज्यामुळे त्यांचा कधी नव्हे तो असा अवतार त्यांच्या फॅन्सना बघावयास मिळाला; मात्र या फोटोमागील खरे वास्तव वेगळेच आहे... कॅटरिना कैफबॉलिवूडची बार्बी गर्ल कॅटरिना कैफ हिचा असाच एक मार्फ फोटो इंटरनेटवर व्हायरल केला गेला. काळ्या रंगाच्या बिकिनी फोटोमध्ये कॅटरिनाला दोन्ही बाजूने दाखविण्यात आले; मात्र फोटोत कॅटरिना खूपच फॅट दाखविण्यात आल्याने तो तिचा खरा फोटो नसावा हे स्पष्ट होते. या फोटोला कॅटरिनाचे सेक्स कॅण्डल अशा रूपात इंटरनेटवर व्हायरल केले गेले. करिना कपूरबेबो करिना कपूर-खानचा असाच एक मॉर्फ फोटो इंटरनेटवर व्हायरल केला गेला. फोटोमध्ये करिना न्यूड दिसत असून, तिने एका पांढºया रंगाच्या साह्याने शरीराचा काही भाग झाकलेला आहे; मात्र फोटोचे निरीक्षण केल्यास एखाद्या मॉडेल्सच्या बॉडीवर करिनाचा चेहरा मार्फ केल्याचे स्पष्टपणे जाणवते. विद्या बालन बिकिनीमध्ये फारच क्वचित दिसलेल्या विद्या बालनचा एक मॉर्फ बिकिनी फोटो आजही तिच्या फॅन्सच्या डोक्यात घर करून आहे. २०११ मध्ये एका साप्ताहिकात प्रसिद्ध झालेला हा फोटो विद्याचा नसून, कुठल्या तरी मॉडेल्सचा आहे. कारण विद्या एवढी स्लीम नाही. सोनाक्षी सिन्हा जेव्हा सोनाक्षी सिन्हाचा हा मॉर्फ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, तेव्हा सोनाक्षी जबरदस्त संतापली होती. हा फोटो व्हायरल होण्याअगोदरच तिने एका साप्ताहिकासाठी फोटोशूट केले होते. दीपिका पादुकोण व्हिक्टोरिया सीक्रेटसाठी दीपिका पादुकोणचा हा मॉर्फ फोटो बनविण्यात आला हाता. वास्तविक दीपिकाला बिकिनीमध्ये बºयाचदा बघण्यात आले आहे, परंतु अशा अवतारात कधीच बघितले नाही. काजल अग्रवालजेव्हा अभिनेत्री काजल अग्रवाल हिचा हा मॉर्फ फोटो व्हायरल झाला तेव्हा तिने एका मॅगझिनवर न्यूड फोटो व्हायरल केल्याचा आरोप केला होता; मात्र काजलचे सर्व आरोप संबंधित मॅगझिनने फेटाळून लावले होते. सेलिना जेटलीसेलिना जेटली हिने तर मॉर्फ फोटो व्हायरल करणाºयाला धडा शिकविण्यासाठी थेट सायबर क्राइमचे दरवाजे ठोठावले होते. सेलिना या फोटोमुळे प्रचंड नाराज झाली होती.