‘मोहेंजोदडो’ फेम पूजा हेगडेचे Smoking Hot फोटोशूट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 10:44 IST
मोहेंजोदडो’मधून बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री ही पूजा हेगडे लोभस चेह-याची हिरोईन सध्या चर्चेत आहे, ती तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे. होय, पूजाने ‘मॅक्झिम’साठी एक हॉट फोटोशूट केले आहे.
‘मोहेंजोदडो’ फेम पूजा हेगडेचे Smoking Hot फोटोशूट!!
मोहेंजोदडो’मधून बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री पूजा हेगडे आठवतेय ना? ‘मोहेंजोदडो’ बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला असला तरी, यातील क्यूट पूजाने सगळ्यांच्याच मनात घर केले होते. तिचे लोभस हास्य आणि चेहºयावरचे निष्पाप भाव, सगळ्यांनाच सुखावून गेले होते. हीच लोभस चेहºयाची हिरोईन सध्या चर्चेत आहे, ती तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे. होय, पूजाने ‘मॅक्झिम’साठी एक हॉट फोटोशूट केले आहे. लवकरच पूजा या मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकणार आहे. या फोटोशूटमध्ये पूजाने पांढºया रंगाचा हॉट अॅण्ड सेक्सी ड्रेस घातलेला आहे. याशिवाय डोळ्यांवरचा स्मोकी मेकअप, लांब मोकळे केस, ओठांवर गुलाबी लिपस्टिक यामुळे पूजाचे सौंदर्य आणखीच खुलून आले आहे. एका सुंदर नेकपीससह पूजाने अतिशय लाजूक डायमंड इअररिंग्स कॅरी केले आहेत.मिस युनिव्हर्स इंडिया2010 मध्ये सेकंड रनरअप राहिलेल्या पूजाने या फोटोशूटचे काही फोटो आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत. आमच्या मॅगझिनच्या मार्च कव्हर गर्लला भेटा, आम्ही कधीच तुमची प्रतीक्षा व्यर्थ जाऊ देणार नाही. अधिक जाणून घ्यायचे असल्याच आमच्या संपर्कात राहा, असे कॅप्शन पूजाने दिले आहे. पूजा हेगडे लवकरच तेलगू चित्रपटात दिसणार आहे. यात ती अल्लू अर्जुनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ‘मोहेंजोदडो’ हा आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित चित्रपट पूजाला कसा मिळाला, यामागे खरे तर एक स्टोरी होती. या चित्रपटातील चानीच्या भूमिकेसाठी आशुतोष यांना एक नवा चेहरा हवा होता. असा चेहरा जो चानीसारखा दिसेल. करारी,आत्मविश्वास व तेजाने भरलेला आणि तरीही निष्पाप असा चेहरा आशुतोष यांना हवा होता.ALSO READ : हृतिकसोबत काम करण्याची पूजाला वाटत होती भितीचित्रपट आपटला पण तोरा कायम!!आशुतोष अशा चेहºयाच्या शोधात होते. याचदरम्यान आशुतोषची पत्नी सुनिता यांना रणबीर कपूरसोबतच्या एका कारच्या जाहिरातीत पूजा दिसली. हीच चानी असे सुनीता यांना वाटले. आशुतोष यांनाही सुनीतांची निवड आवडली. तिच्यातील स्क्रीन प्रेझेन्स त्यांना आवडला आणि आशुतोष यांना ‘मोहेंजोदडो’साठी हिरोईन मिळाली. आशुतोष यांनी लगेच पूजाला बोलवले. आॅडिशन्स झाली आणि पूजाने हा चित्रपट साईन केला.