मिजान जाफरी!! होय,संजय लीला भन्साळी कंपूत होणार या स्टारकिड्सची एन्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 12:20 IST
रणबीर कपूर आणि सोनम कपूर यांना लॉन्च करणारे बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आता आणखी एका स्टार किड्सला लॉन्च ...
मिजान जाफरी!! होय,संजय लीला भन्साळी कंपूत होणार या स्टारकिड्सची एन्ट्री!
रणबीर कपूर आणि सोनम कपूर यांना लॉन्च करणारे बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आता आणखी एका स्टार किड्सला लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. होय, लोकप्रीय अभिनेता आणि कोरिओग्राफर जावेद जाफरी याचा मुलगा मिजान जाफरी याला भन्साळी लॉन्च करणार आहेत.संजय लीला भन्साळी नेहमी नव्या टॅलेंटला संधी देतात. याच क्रमात भन्साळी मिजानला संधी देणार आहेत. ‘बाजीराव मस्तानी’मध्ये मिजानने भन्साळींना अस्टिस्ट केले होते. मिजान स्वत: मार्टल आर्ट्स व थिएटर करतो. शिवाय आपल्या वडिलांसारखाच तो एक उत्तम डान्सर आहे. न्यूयॉर्कमध्ये त्याने चार वर्षे फिल्म मेकिंग व व्हिज्युअल आर्ट्सचा कोर्सही केला आहे. मिजानने अलीकडे भन्साळींच्या एका चित्रपटासाठी आॅडिशन दिले होते आणि त्यादरम्यान मिजानचे टॅलेंट बघून भन्साळी चाट पडले. त्याचक्षणी मिजानला लॉन्च करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे कळते. भन्साळी निर्मित हा चित्रपट मंगेश हाडावले डायरेक्ट करणार. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. ALSO READ : ‘फनलव्हिंग’ नव्या नवेलीसोबतचा ‘तो’ मिस्ट्री बॉय आहे ‘या’ अभिनेत्याचा मुलगा!अलीकडे मिजान हा अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्यासोबत हँगआऊट करताना दिसला होता. नव्या आणि मिजान एकाच फ्रेन्ड सर्कलमधील आहेत. दोघेही गेल्या काही काळापासून एकमेकांना ओळखतात. एकमेकांसोबत वेळ घालवणे दोघांनाही आवडते. सध्या नव्या मुंबईत आहे. काही दिवसांनंतर ती शिक्षणासाठी युएसला परत जाणार आहे. त्यामुळे सध्या नव्या व मिजान परस्परांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. दोघांनीही मुव्ही डेट एन्जॉय केली होती. यानंतर ते एका नाईट क्लबमध्ये दिसले होते. यावरून या दोघांमध्ये काहीतरी खिचडी पकतेय, असा निष्कर्ष काढणे सध्या तरी घाईचे ठरेल. पण दोघांचीही मैत्री जोरात आहे, असे मात्र आपण नक्कीच म्हणू शकू. एकंदर काय तर, मिजानच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा सध्या जोरात आहे. पण त्याआधीच नव्यासोबतचा ‘मिस्ट्री बॉय’ म्हणून तो प्रसिद्ध झाला आहे.