Join us  

‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर बॉलिवूडच्या दिशेने! टायगर श्रॉफच्या गर्लफ्रेन्डला केले रिप्लेस!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 4:52 AM

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिने बॉलिवूडच्या दिशेने आपले पहिले पाऊल टाकलेय. होय, संकेत तरी तसेच आहेत. फॅशन फोटोग्राफर डब्बू रतननानी याच्या कॅलेंडरवर मानुषी झळकलीयं.

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिने बॉलिवूडच्या दिशेने आपले पहिले पाऊल टाकलेय. होय, संकेत तरी तसेच आहेत. फॅशन फोटोग्राफर डब्बू रतननानी याच्या कॅलेंडरवर मानुषी झळकलीयं. बॉलिवूड स्टार्सच्या अदांनी सजलेले हे कॅलेंडर काल रात्री प्रकाशित केले गेले. डब्बू रतनानीच्या या कॅलेंडरसाठी फोटोशूट ही एक सन्मानाची बाब समजली जाते. दरवर्षी या कॅलेंडरसाठी बॉलिवूडचे टॉप मोस्ट चेहरे निवडले जातात.यंदा डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडरसाठी बॉलिवूडच्या २४ स्टार्सला निवडण्यात आले. यात शाहरूख खान, काजोल, अमिताभ बच्च, ऐश्वर्या राय अशा अनेकांचा समावेश आहे. या यादीत यंदाची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिचेही नाव आहे.डब्बू रतनानीच्या या कॅलेंडरसाठी करण्यात आलेल्या फोटोशूटमध्ये मानुषी अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसून आली. याचा ‘बिहाईन्ड द सीन’ व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. मानुषीने या फोटोशूटसाठी वेगवेगळ्या रंगाचा बॉडी सूट घातला आहे. मानुषीने या कॅलेंडरमध्ये अभिनेत्री दिशा पटनी हिला रिप्लेस केले आहे. एकंदर काय तर मानुषीने डब्बू रतनानीच्या कॅलेंडरवर स्थान मिळवून बॉलिवूडच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता बॉलिवूडमध्ये तिची एन्ट्री कशी होते, कुणाच्या माध्यमातून होते आणि किती ग्रॅण्ड होते, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.ALSO READ : ​रिता फारिया ते मानुषी छिल्लर ! या भारतीय सौंदर्यवतींनी पटकावला ‘मिस वर्ल्ड’ मुकुट!!मानुषी सध्या सोनीपत मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस सेकंड ईयरची स्टुडंट आहे. मिस वर्ल्ड किताब जिंकल्यानंतर मानुषी लगेच बॉलिवूडमध्ये येणार, असे वाटले होते. पण मानुषी आपला एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहे. हार्ट स्पेशालिस्ट बनण्याची तिची इच्छा आहे. अर्थात यादरम्यान एखादी चांगली स्क्रिप्ट मिळालीच तर ती बॉलिवूडमध्येही येऊ शकते.मिस वर्ल्ड बनल्यानंतर एका मुलाखतीत मानुषीने आमिर खानसोबत स्क्रिन शेअर करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. आमिर सामाजिक मुद्यांवर चित्रपट बनवतो. त्याला समाजाची नस चांगलीच कळते, असे ती म्हणाली होती.