Join us  

मृत्युनंतरही चिंरजीवी सरजाने सोडली नाही पत्नीची साथ, डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 3:26 PM

चिरंजीवी सरजा यांचे 2 मे 2018 रोजी कन्नड अभिनेत्री मेघना राजसोबत लग्न झाले होते. मेघना राज ही देखील कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजाने वयाच्या 39 व्या वर्षी जगाचा कायमचा निरोप घेतला.  7 जून रोजी त्याचे हृदय विकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले होते. त्याच्या मृ्त्युवेळी चिंरजीवीची पत्नी गरोदर होती. बाळाचा चेहरा बघण्यापूर्वीच चिरंजीवीने जगाचा निरोप घेतला. चिरंजीवी यांचे 2 मे 2018 रोजी कन्नड अभिनेत्री मेघना राजसोबत लग्न झाले होते. मेघना राज ही देखील कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

त्यांच्या अचानक जाण्याने पत्नीला मोठा धक्का बसला आहे. नुकतेच मेघनाचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. मेघनाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.एका फोटोने सा-यांचे लक्ष वेधले.

 

 हा फोटो पाहून अनेकांना अश्रु अनावर झाले आहेत. चिरंजीवी आज आपल्यात नाही हा विचारही करवत नसून असे काही घडले असेल अशा धक्क्यातच आजही चाहते आहेत.

मेधनाच्या बाजुला चिरंजीवी उभा असल्याचे पाहायला मिळतंय. खरंतर चिरंजीवीच्या फोटोचे कटआऊट पोस्टर उभे करण्यात आले आहे. मात्र फोटो पाहताच खरोखर चिंरजीवी पत्नी मेघनासह उभा असल्याचे वाटते. या फोटोमुळे पुन्हा एकदा चाहते भावूक झाले. दोघेही त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहात होते. मात्र नियतीच्या मनात काही औरचे होते. पहिल्या बाळाला पाहण्याआधीच चिरंजीवी निधन झाले. त्याच्या निधनानंतर आजही कुंटुबिय दुःखातून सावरलेले नाही. 

चिरंजीवीच्या आठवणीत मेघनाने अतिशय भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. मेघनाने  इन्स्टाग्रामवर चिरंजीवीसोबतचा फोटो शेअर करत लिहिले, 'चिरू, मी बर्‍याचदा प्रयत्न केला. पण ,मला जे काय म्हणायचे आहे ते सांगण्यासाठी शब्द सापडले नाहीत. या जगातील कोणतेही शब्द तू माझ्यासाठी काय होतास हे सांगू शकत नाहीत. माझा मित्र, माझा प्रियकर, माझा साथीदार, माझा नवरा - तू या सर्वांपेक्षा अधिक काही माझ्यासाठी होतास. तू माझ्या आत्म्याचा एक भाग आहेस चिरु. मी जेव्हा दरवाजाकडे पाहते  तेव्हा मला अनेक वेदना होतात. 'मी आलो' असे म्हणत तू आत येत नाहीस.

मी तुला नेहमी माझ्या आजूबाजूला असल्याचा भास होतो. तू माझ्यावर खूप प्रेम केलंस म्हणून मी तुला एकटे सोडू शकत नाही. आपलं बाळ हे आपल्या प्रेमाची निशाणी आहे. या प्रेमासाठी मी तुझी नेहमीच आभारी राहिन. मी तुला आपल्या मुलाच्या रुपात पुन्हा पृथ्वीवर आणण्याची प्रतीक्षा करु शकत नाही, मी तुझी वाट पाहत आहे आणि तूसुद्धा दुसर्‍या टोकाला माझी वाट पाहाशील. जोपर्यंत माझा श्वास सुरु आहे तोपर्यंत मी जिवंत आहे. तू माझ्यात आहेस. आय लव्ह यू.