मीरा एक अमेझिंग कूक -शाहिद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2016 19:01 IST
काही कलाकार लग्नानंतर बदलतात असं एक गृहितक बॉलिवूडमध्ये मानलं जातं. पण, शाहिदच्या बाबतीत हे साफ खोटंय असे तो मानतो. ...
मीरा एक अमेझिंग कूक -शाहिद
काही कलाकार लग्नानंतर बदलतात असं एक गृहितक बॉलिवूडमध्ये मानलं जातं. पण, शाहिदच्या बाबतीत हे साफ खोटंय असे तो मानतो. मीरासोबत लग्न झाल्यानंतर त्याचं आयुष्य बदललं पण तो बदलला नाही, असे तो स्पष्ट करतो. ‘व्होग बीएफएफ’ च्या टॉक शोमध्ये शाहिदला त्याच्या कुकिंगविषयी विचारण्यात आले असता तो म्हणाला,‘मी चांगला कूक नाही. मी केवळ चहा आणि पराठे बनवू शकतो. मात्र माझी पत्नी मीरा एक अमेझिंग कूक आहे. ती माझ्या आयुष्यात येण्याअगोदर मी जेलमध्ये खाल्ले जाते तसे जेवण करायचो. त्याला कशाचाच स्वाद नसायचा. माझे मित्र, परिवार कोणीही माझ्या घरी जेवण करत नसे. तिने आमच्या घरात एन्ट्री केली अन् घरी जेवणासाठी येणाऱ्या जाणाऱ्याच्या संख्येतही वाढ होत गेली. तिच्या हातचे जेवण करून सर्वजण तृप्त होतात.’ शाहिद कपूर आणि मीरा राजपूत कपूर हे कपल बॉलिवूडचं ‘मेड फॉर इच अदर’ कपल मानलं जातं. काही महिन्यांपूर्वी हे कपल त्यांच्या बाळाचे प्रेमळ पालक बनल्याचं आपल्याला ठाऊक आहे.