Join us  

एकेकाळी सिग्नलवर च्युइंंग गम विकणारा मराठमोळा तरुण बनला स्टार, आता बॉलिवूडवर करतोय राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 12:31 PM

आज जरी त्यांची गणना बॉलिवूडच्या नावाजलेल्या दिग्दर्शकांमध्ये होत असली तरी एक काळ असा होता की ते सिग्नलवर च्युइंगम विकायचे. त्यांनी कॅसेटच्या दुकानातही काम केले, त्यानंतर फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले आणि सर्वांनाच आपले फॅन बनवले.

आज जरी त्यांची गणना बॉलिवूडच्या नावाजलेल्या दिग्दर्शकांमध्ये होत असली तरी एक काळ असा होता की ते सिग्नलवर च्युइंगम विकायचे. त्यांनी कॅसेटच्या दुकानातही काम केले, त्यानंतर फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले आणि सर्वांनाच आपले फॅन बनवले. हे व्यक्तिमत्त्व दुसरं तिसरं कुणी नसून प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) आहेत. मधुर भांडारकर यांचा आज वाढदिवस आहे. मधुर भांडारकर यांचा जन्म २६ ऑगस्ट १९६८ रोजी मुंबईत झाला होता. 

मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या मधुर भांडारकर यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांना सहावीतच शिक्षण सोडावे लागले. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांना ट्रॅफिक सिग्नलवर च्युइंग गम विक्री करावी लागली. मात्र, कालांतराने ते काही ना काही शिकत राहिले.आपल्या संघर्षाच्या दिवसांत मधुर यांनी कॅसेटच्या दुकानातही काम केले. त्या काळात त्यांनी खूप कॅसेट्स पाहिल्या. हळूहळू मधुर यांनी स्वतः कॅसेटचा व्यवसाय सुरू केला आणि १७०० कॅसेट जमा केल्या. तसेच त्यांना चित्रपट निर्मितीतील बारकावे समजू लागले. त्या काळात त्यांनी अनेक छोट्या दिग्दर्शकांसोबत काम केले, ज्यासाठी त्यांना एक हजार रुपये मानधन मिळू लागले. त्यांनी राम गोपाल वर्मा यांच्यासोबत सहाय्यक म्हणूनही काम केले.

पहिलाच चित्रपट ठरला फ्लॉप लोकांच्या सल्ल्याने मधुर भांडारकर यांनी पहिला चित्रपट त्रिशक्ती बनवला होता. मात्र, तो चित्रपट खूप फ्लॉप झाला, त्यामुळे लोक मधुर भांडारकरला टाळू लागले. मात्र, त्यांनी हिंमत हारली नाही. यानंतर मधुर भांडारकर यांनी मुंबईच्या रस्त्यांवर आणि रस्त्यांवर भटकण्याचा अनुभव घेऊन चांदनी बार हा चित्रपट बनवला, त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. मधुर भांडारकर यांनी ट्रॅफिक सिग्नल, पेज ३ आणि फॅशन सारखे चित्रपट केले, त्यानंतर ते नामवंत दिग्दर्शकांच्या यादीत सामील झाले. शेवटचे त्यांचे इंडिया लॉकडाऊन आणि बबली बाउंसर हे चित्रपट रिलीज झाले.  

टॅग्स :मधुर भांडारकर