Join us  

मराठमोळ्या अनुषा दांडेकरचा बोल्ड फोटो पाहून तुम्हाला लागेल 440 व्होल्टेजचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 6:00 AM

अनुषा दांडेकर हिने काळ्या रंगाच्या ट्रान्सपरंट टॉपमधील फोटो शेअर केला आहे.

मराठमोळी अभिनेत्री व मॉडेल अनुषा दांडेकरची गेल्या कित्येक दिवसांपासून तिच्या ब्रेकअपची चर्चा सुरू होती. मात्र याबाबत तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्राने खुलासा केला आहे. त्याने त्यांचे ब्रेकअप न झाल्याचे सांगितले. अनुषा सोशल मीडियावर एक्टिव्ह असते. ती फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने हॉट फोटो शेअर केला आहे.

अनुषा दांडेकर हिने काळ्या रंगाच्या ट्रान्सपरंट टॉपमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोला खूप लाइक्स व कमेंट्स येत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकरच्या ब्रेकअपची चर्चा सुरु आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, करण कुंद्राने हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना आम्ही एकत्र आहोत, आपलं ब्रेकअप झालं नसल्याचा खुलासा केला. करण म्हणाला, काही दिवस आम्ही एकत्र राहतो काही दिवस आपल्या घरी. मी हरियाणामध्ये शूटिंग करत होतो आणि लॉकडाऊनच्या आधी मुंबईत आलो.

सध्या आम्ही दोघे एकत्र राहत नाही आहोत, त्यामुळे सगळ्यांना वाटतेय आमचं ब्रेकअप झाले आहे. मी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नाही आहे म्हणून आमच्या ब्रेकअपची अफवाह पसरवण्यात आली. मला या सगळ्या गोष्टींमुळे फरक पडत नाही मात्र अनुषा इमोशनल आहे तिला फरक पडतो.

अनुषा व करण दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत होते. सोशल मीडियावरच्या त्यांच्या फोटोत दोघांचीही केमिस्ट्री पाहण्यासारखी होती. आधी करण हा कृतिका कामरासोबत रिलेशनशिपमध्ये होता. 

टॅग्स :अनुषा दांडेकरकरण कुंद्रा