Join us  

या शुल्लक कारणामुळे मल्लिका शेरावतने दिला होता पहिल्या नव-याला घटस्फोट, आता बॉयफ्रेंडसोबत थाटले दुसरे लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 2:34 PM

एअर होस्टेस असलेली मल्लिकालाही इतर मुलीप्रमाणे ग्लॅमरस इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा निर्माण झाली.

चित्रपटसृष्टीत दिवसागणिक नाती कशी बदलतात हे सांगणं कठीण. आज रिलेशनशिपमध्ये असणारे कपल उद्या एकत्र दिसतीलच असं नाही. त्यामुळेच कितने अजीब रिश्ते है यहाँ पे या गाण्याच्याओळी सेलिब्रिटींसाठी तंतोतंत लागू पडतात. असं काहीसं झाले होते अभिनेत्री मल्लिका शेरावतबरोबर. 

विशेष म्हणजे मल्लिका सिनेमात एंट्री करण्यापूर्वीच विवाहित होती.  मल्लिका शेरावतचे खरे नाव रिमा लांबा आहे. सिनेमात झळकण्यापूर्वी ती एअरहोस्टेस म्हणून काम करायची.  तिथेच तिची पायलट असलेल्या करण सिंह गिलसोबत ओळख झाली. त्यांची चांगली मैत्री झाली, दोघेही  एकत्र वेळ घालवत असे. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले आणि  दोघांनीही कुटुंबियांच्या संमतीने लग्न करत संसार थाटला. सर्वकाही सुरळीत सुरु असताना असे काही घडले की, मल्लिकाने थेट पतीपासून काडीमोड घेण्याचा निर्णय घेत वेगळी झाली. 

एअर होस्टेस असलेली मल्लिकालाही इतर मुलीप्रमाणे ग्लॅमरस इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा निर्माण झाली. मात्र सिनेमात काम करण्यास कदाचित तिच्या पतीचा विरोध असावा. म्हणूनच चंदेरी दुनियेत कोणत्याही प्रकारची कामाची सुरूवात नसतानाही तिने करणला घटस्फोट दिला आणि मॉडेलिंगला सुरूवात केली. अनेक व्यावसायिक जाहिरातीत झळकण्याची संधीही तिला मिळाली. त्यानंतर 'मर्डर', 'ख्वाहिश', 'अनफेथफुल','हिस्स', 'डर्टी पॉलिटिक्स', 'तेज', 'वेलकम' तसेच हॉलिवूड, बॉलिवूडच्या सिनेमात झळकत तिने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  

टॅग्स :मल्लिका शेरावत