Join us  

मल्लिका शेरावतवर पॅरिसमध्ये हल्ला; मारहाण, मौल्यवान वस्तूंची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2016 8:59 PM

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मल्लिका शेरावत हिला फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये मारहाण करण्यात आली असल्याची चर्चा आहे. पॅरिसमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी मल्लिकाला ...

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मल्लिका शेरावत हिला फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये मारहाण करण्यात आली असल्याची चर्चा आहे. पॅरिसमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी मल्लिकाला तिच्या घराबाहेर मारहाण करीत मौल्यवान वस्तू लुटल्या. मल्लिकाने या घटनेची तक्रार पॅरिस पोलिसांत केली. मल्लिकाने पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार, हल्लेखोरांनी चेहºयावर मास्क लावले होता. यामुळे असल्यामुळे त्यांची अद्याप ओळख पटविणे पोलिसांसाठी कठीण झाले आहे. घटनाक्रमानुसार, ११ नोव्हेंबरच्या रात्री मल्लिका एका कार्यक्रमातून परत येत होती. घरासमोर आली असताना काही मास्कधारी युवकांनी अश्रुधुराचा वापर करत मल्लिका व तिच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीला मारहाण केली. यासोबतच तिच्याकडे असलेला मौल्यवान ऐवज लुटून नेला. मल्लिकाने लगेच पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असला तरीही हल्लेखोरांचा चेहरा झाकलेला असल्याने त्यांची ओळख पटवण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी अमेरिकन रिअ‍ॅलिटी स्टार किम कर्दशांवर एका महिन्यापूर्वी पॅरिस फॅशन विक दरम्यान अशाच प्रकारचा हल्ला करण्यात आला होता. किमवर झालेल्या हल्ल्यात तिच्याकडचे पैसे आणि दागिने चोरट्यांनी पळविले होते. आता पुन्हा एकदा त्याच प्रकारची घटना घडल्याने पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही घटनांत सेलिब्रेटींना लक्ष्य करण्यात आल्याने हल्लेखोर श्रीमंत व्यक्तींच्या पॅरिसमधील हालचालीवर लक्ष ठेवून असावेत असाही संशय बळावला आहे. मागील काही दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर असलेल्या मल्लिकाने लग्न केल्याची चर्चा होती. पॅरिसमध्ये घडलेल्या घटनेमुळे मल्लिकाने धसका घेतला आहे. ती लवकर यातून सावरेल अशी आशा करूया.