Join us  

मुन्नी बदनाम हुई!! मलायका अरोरानं चक्क रस्त्यावरची फुलं चोरली; विश्वास बसत नसेल तर फोटो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 10:46 AM

बोल्ड व ग्लॅमरस फोटोंमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री मलायका चोरी करुन गाडीत बसली पण फसली...

ठळक मुद्देमलायकाच्या या फोटोवर चाहत्यांनी तर कमेंट्स केल्याच. पण बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट्स केल्यात.

बोल्ड व ग्लॅमरस फोटोंमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री मलायका अरोरा सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, मलायकाने काय केले तर चक्क रस्त्यावरच्या फुलांची चोरी केली. विशेष म्हणजे, फुलं चोरल्याची कबुलीही तिने स्वत:च दिली.सर्रास मलायकाचे जिम लुकचे किंवा पार्टीचे फोटो पाहायला मिळतात. पण सध्या मात्र फुलं चोरतानाचा तिचा एक फोटो समोर आला आहे. मलायकाने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे.

या फोटोत मलायकाच्या एका हातात एक कैची आहे आणि दुस-या हातात चोरलेल्या बोगनवेलीच्या फुलांची फांदी. या फुलांच्या फांदीने मलायकाने तिचा चेहरा झाकलेला आहे. ‘फूल चोर (वसंत सुरु झाला आहे)’, असे हा फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे. मलायकाच्या या फोटोवर चाहत्यांनी तर कमेंट्स केल्याच. पण बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट्स केल्यात. अनेक चाहत्यांना मलायकाने केलेली फुलांची चोरी आवडली नाही. प्लीज असे करू नकोस, असा सल्ला काही चाहत्यांनी तिला दिला. तर काहींनी यावरून तिची मजाही घेतली. फूल चोर, अर्जुन कपूर का दिल चोर भी है, असे एका युजरने लिहिले.

मलायका अरोरा फुलांसाठी वेडी आहे. अलीकडे ती बहीण अमृता अरोराच्या बर्थ डे पार्टीत गेली होती. पार्टीतून परतताना तिच्या हातात फुलांचा गुच्छ दिसला होता.

अर्जुन कपूर व मलायका दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. आधी दोघांनीही जगापासून लपवून ठेवले, पण आता दोघेही अगदी खुल्लमखुल्ला फिरताना दिसतात. सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करतात. याआधी असाच एक व्हॅकेशनचा रोमॅन्टिक फोटो शेअर करत अर्जुन व मलायकाने आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. त्याआधी करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये मलायकाने अर्जुनवरच्या प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती. पाठोपाठ अर्जुन कपूरनेदेखील याच चॅट शोमध्ये अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिले होते.

टॅग्स :मलायका अरोरा