Join us  

इतना पैसा फिर भी फटेहाल...! पार्टीत लाखोंचा ड्रेस अन् बाहेर फाटकी जीन्स, मलायका झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 6:07 PM

बहिणीच्या घरच्या छोट्याशा पार्टीत लाखोंचा ड्रेस घालून मिरवणारी मलायका फाटक्या जीन्समध्ये दिसली. मग काय, लोकांनी नेहमीप्रमाणे तिला ट्रोल केले.

ठळक मुद्देमलायका अरोरा आपल्या फिटनेसला घेऊन खूप अर्लट असते.

नुकतीच अमृता अरोराच्या घरी पार्टी झाली होती. या पार्टीत अमृताची बहीण मलायका अरोरा एकदम स्टायलिश लूकमध्ये पोहोचली होती. तिच्या ड्रेसची किंमत किती होती तर 1.5 लाख रूपये. बहिणीच्या घरच्या छोट्याशा पार्टीत लाखोंचा ड्रेस घालून मिरवणारी हीच मलायका आता फाटक्या जीन्समध्ये दिसली. मग काय, लोकांनी नेहमीप्रमाणे तिला ट्रोल करणे सुरु केले.

इतना पैसा फिर भी फटेहाल..., असे म्हणत एका युजरने तिला डिवचले. का काही काम मिळत नाहीये का? असा सवाल तिची फाटकी जीन्स पाहून एका युजरने तिला विचारला.मलायकाला या ट्रोलिंगमुळे काहीही फरक पडत नाही, हे माहित असूनही अनेक युजर्सनी या कपड्यांवरून तिची खिल्ली उडवली.

अन् पॅन्ट घालायला विसरली...मलायकाने अलीकडेच इन्स्टाग्राम स्टोरीजवर दोन मजेदार किस्से शेअर केले  होते. यात तिने कोविड -19 ची लस घेतल्यानंतर घरी येणा-या सर्व पाहुण्यांना काय सांगते, ते लिहिले होते. ‘आधी जेव्हा पाहुणे घरी यायचे, तेव्हा मी त्यांना म्हणायचे, घाबरू नका, आमच्या कुत्र्याचे लसीकरण केले आहे. आता मी त्यांना   घाबरू नका, आम्हीसुद्धा व्हॅक्सिनेशन केलेआहे, असे सांगते,’अशी एक मजेदार पोस्ट तिने शेअर केली होती.

मलायकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर आणखी एक किस्सा शेअर करताना लिहिले होते की, ‘मी एका रेस्टॉरंटच्या बाथरूममध्ये गेले होते. कोरोनाची इतकी भीती की,  मी हाताच्या कोपराने दरवाजा उघडला,  पायाने टॉयलटची सीट उचलली.  टिश्शूच्या मदतीने पाण्याचा वापर केला, हात धुतले आणि मग बाथरूमचा दरवाजा कोपरानेच बंद केला आणि जेव्हा मी टेबलाकडे परत आले तेव्हा मला कळले की मी पॅन्ट घालायला विसरले....’

टॅग्स :मलायका अरोरा