Join us  

मलायका अरोराने अरबाज खानला लग्नासाठी केले होते प्रपोज, कपिल शर्माच्या शोमध्ये केला होता खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 6:00 AM

पाच वर्षे मलायकाला डेट करणाऱ्या अरबाज खानने तिला लग्नासाठी प्रपोझ केले नव्हते तर मलायकाने पुढाकार घेत त्याला लग्नासाठी विचारले होते.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या फिटनेस आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत येत असते. मलायका आणि अरबाज खानच्या लव्हस्टोरीपासून घटस्फोटांपर्यंतची स्टोरी सर्वांच्याच परिचयाची आहे. फार कमी लोकांना माहित आहे की पाच वर्षे मलायकाला डेट करणाऱ्या अरबाज खानने तिला लग्नासाठी प्रपोझ केले नव्हते तर मलायकाने पुढाकार घेत त्याला लग्नासाठी विचारले होते. मलायकाने स्वतःच या गोष्टीचा खुलासा कपिल शर्मा शोमध्ये केला होता.

मलायका अरोरा आणि अरबाज खान आता विभक्त झाले आहेत. मात्र ते दोघे एकत्र असताना त्यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नाचे किस्से सांगितले होते. मलायका जेव्हा कपिल शर्माचा शो कॉमेडी नाइट्स विथ कपिलमध्ये गेली होती तेव्हा कपिलने लग्नाचे सत्य पडताळून घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा मलायकादेखील कपिलच्या तोंडून ही गोष्ट ऐकून हैराण झाली होती आणि मग तिला याचा खुलासा सर्वांसमोर करावा लागला.

मलायकाने सांगितले की कसे तिने लग्नासाठी अरबाजला विचारले होते. व्हिडीओत मलायका अरोराने म्हटले की, लग्नाच्या पाच वर्षानंतर मी त्यांना नाते पुढे नेण्यासाठी लग्न करण्यासाठी विचारले होते. याच्या उत्तरात त्यांनी हो म्हणायला जराही उशीर केला नाही. अरबाजने फक्त हेच म्हटलं की तारीख आणि वेळ सांग मी येईन.

अरबाज आणि मलायकाची भेट १९९३ साली एका कॉफीच्या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. या शूटदरम्यान त्यांच्यात प्रेम फुलू लागले होते आणि पाच वर्षे डेट केल्यानंतर १२ डिसेंबर, १९९८ साली दोघांनी ख्रिश्चन आणि मुस्लिम रितीरिवाजात लग्न केले होते. मात्र लग्नाच्या १९ वर्षांनंतर मलायकाने अरबाजसोबतचे नाते संपवून टाकले. २०१७ साली अरबाजने पत्नी मलायकासोबत घटस्फोट घेतला.

घटस्फोटानंतरही अरबाज आणि मलायकामधील नाते चांगले आहे. एकीकडे अरबाज खान जॉर्जिया अँड्रियानीला डेट करतोय तर दुसरीकडे मलायका अर्जुन कपूरला डेट करते आहे. दोन्ही कपल्सचे फोटो सोशल मीडियावर बऱ्याचदा पहायला मिळतात.

टॅग्स :मलायका अरोराअरबाज खानअर्जुन कपूरजॉर्जिया एंड्रियानी