Join us  

मलाइका अरोराने अरबाज खानला घातली होती लग्नाची मागणी; वाचा घटस्फोट झालेल्या या जोडप्यारीची लव्हस्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 9:12 AM

१९९६ मध्ये आलेल्या ‘दरार’ या चित्रपटात सायको पतीची भूमिका साकारून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणारा अभिनेता अरबाज खान याने काही ...

१९९६ मध्ये आलेल्या ‘दरार’ या चित्रपटात सायको पतीची भूमिका साकारून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणारा अभिनेता अरबाज खान याने काही दिवसांपूर्वीच पत्नी मलाइका अरोरा हिच्याशी घटस्फोट घेतला. तब्बल १८ वर्ष संसार केल्यानंतर हे दोघे एकमेकांपासून विभक्त झाले. वास्तविक या दोघांची लव्हस्टोरी पाहता हे दोघे जन्मोजन्मी एकमेकांना साथ देतील, असेच वाटत होते. १९९८ मध्ये विवाहाच्या बंधनात अडकलेल्या या दोघांची लव्हस्टोरी खूपच रोमॅण्टिक अशी होती. कारण दोघांच्या पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतची कथा एखाद्या चित्रपटात शोभेल अशीच आहे. अरबाज एक भारतीय कलाकार तथा निर्माता आहे. वास्तविक अरबाजचे फिल्मी करिअर फार विशेष राहिले नाही. मात्र एक यशस्वी निर्माता म्हणून त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली. अरबाजच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या पहिल्याच ‘दबंग’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. असो, अरबाज मलाइकाच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचे झाल्यास या नात्याची सुरुवात मलाइकाकडून झाली. होय, मलाइका अगोदर अरबाजवर फिदा झाली. पुढे अरबाजही मलाइकाच्या प्रेमात ओढला गेला. त्यानंतर या प्रेमाचे रूंपातर लग्नात झाले. वास्तविक हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा अरबाज खान भाऊ सलमान खानसोबत एका जाहिरातीची शूटिंग करीत होता. अरबाज आणि मलाइकाची भेट याच अ‍ॅड शूटिंगदरम्यान झाली होती. पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांवर चांगलेच इम्प्रेस झाले. पुढे हे दोघे एका क्लबमध्ये भेटले. यावेळी भाऊ सलमानही अरबाजसोबत होता. जेव्हा हे दोघे भाऊ क्लबमध्ये पार्टीसाठी पोहोचले तेव्हा पार्टीतील सर्व मुलींनी सलमानकडे धाव घेतली. परंतु मलाइका अरबाजकडे गेली. तिला सलमानपेक्षा अरबाजची कंपनी चांगली वाटली. मात्र अरबाज सुरुवातीपासूनच लाजाळू असल्याने त्याने मलाइकासोबत बोलताना जराशी सावधगिरीच बाळगली. जेव्हा ही बाब मलाइकाच्या लक्षात आली तेव्हा तिनेच पुढाकार घेत अरबाजला लग्नाची मागणी घातली. पुढे तब्बल पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर १९९८ मध्ये दोघे विवाहाच्या बंधनात अडकले. सुरुवातीला या दोघांनी चर्चमध्ये लग्न उरकले; त्यानंतर दोघांनी मुस्लीम परंपरेनुसार विवाह केला. तब्बल १८ वर्ष एकमेकांसोबत संसार केल्यानंतर हे दोघे विभक्त झाले. अरबाज आणि मलाइकाला एक मुलगा आहे.