Join us  

​माधुरी दीक्षितने तेजाब या चित्रपटाच्या वेळेचा शेअर केला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2018 11:02 AM

माधुरी दीक्षितने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणूनच तिला ओळखले जाते. हम आपके है ...

माधुरी दीक्षितने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणूनच तिला ओळखले जाते. हम आपके है कौन, तेजाब, दिल, दिल तो पागल है, साजन, खलनायक, बेटा यांसारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत. बॉलिवूड चित्रपटांमध्ये मिळालेल्या यशानंतर माधुरी मराठीत काम कधी करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली होती. एखादी चांगली पटकथा असल्यास मी मराठी चित्रपटात काम करेन असे माधुरीने अनेक वेळा सांगितले होते. आता ती बकेट लिस्ट या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. माधुरी मराठी चित्रपटात काम करणार हे तिच्या फॅन्सना कळल्यापासून त्यांना चांगलाच आनंद झाला आहे. माधुरीने तिच्या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली असून या चित्रपटात तिच्यासोबत सुमीत राघवनची मुख्य भूमिका आहे.माधुरी दीक्षितचा तेजाब हा चित्रपट प्रेक्षकांना आडवतो. या चित्रपटात तिने साकारलेल्या मोहिनी या भूमिकेचे प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक केले होते. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरी या चित्रपटात तिने साकारलेली मोहिनी ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटातील या भूमिकेविषयी तिने नुकत्याच एका मुलाखतीत एक गंमत सांगितली. या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना किती आवडली होती याचा किस्सा ती कधीच विसरू शकत नाही. तेजाब हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यावेळी माधुरी मुंबईत नव्हती. ती तिच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने परदेशात गेली होती. तेजाब या चित्रपटामुळे लोक तिला ओळखायला लागले होते. त्यावेळी घडलेली एक घटना तिच्यासाठी खूप खास आहे. याविषयी ती सांगते, तेजाब हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यावेळी मी परदेशात होते. परदेशातून परतताना विमानतळावर काही लहान मुलांनी माझ्याकडे ऑटोग्राफ मागितला होता. त्यातल्या एकाला मी ऑटोग्राफ दिल्यावर तो दुसऱ्याला म्हणाला, बघ हिने ऑटोग्राफ देताना एम असे लिहिले आहे. मी बोललो होतो ना... हिचे नाव मोहिनी आहे... त्यावर मला खूपच हसायला आले होते. Also Read : ​या मराठमोळ्या अभिनेत्रीला गवसली नवीन मैत्रीण,शूटिंगच्या सेटवर अशी करतात मौजमस्ती